गोदातीरी उभे राहून उध्दव ठाकरे यांनी वल्गना केली की, भाजपाला राममुक्त करायचे आहे. तुम्ही काय ही ओवेसींकडून सुपारी घेतली आहे का? भारतीय मनातून राम वेगळा काढायला ओवेसीच्या बापाला तरी जमेल काय? भाजपाचे बाप म्हणून वंदनीय शामाप्रसाद मुखर्जी यांनी कुणाशी युती केली त्याचा जाब आम्हाला आज विचारताय? आमचाच सवाल तुम्हाला आहे की, शिवसेना स्थापना करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही काय केलेत? सख्या भावासह चुलत भावालाही घराबाहेर बाहेर काढणाऱ्या उध्दव ठाकरे यांना रामायणातील वाली, सुग्रीव अशी बरीच पात्र आठवतात.. पण रामाच्या पादूका सिंहासनावर ठेवून राज्य करणारा भरत तुम्हाला का आठवत नाही? असा थेट सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.
उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथून त्यांच्या पक्षाच्या महा मेळाव्यात सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर देताना अँड. शेलार यांनी म्हणाले की, कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ आहे ‘…छान झाले, दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही!’ अशा ओळीत त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला अँड. शेलार यांनी दिला.
संजय राऊत हे जेवढे बोलतात तेवढा त्यांचा पक्ष कमी कमी होत जातोय. बहुतेक नँनोत मावेल एवढा पक्ष म्हणजे शिल्लक गट उरेल, अशी त्यांची इच्छा आहे बहुतेक. त्यामुळे संजय राऊत यांची महाराष्ट्रभर भाषणे उबाठाने ठेवावीत, असा टोलाही यावेळी शेलार यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community