Ayodhya Rammandir : मुसलमानांमध्ये भीती निर्माण झाली; राममंदिरावर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

326
Ayodhya Rammandir : रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका
Ayodhya Rammandir : रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

अयोध्येत श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याची बातमी देशातील नव्हे, तर विदेशातील प्रसारमाध्यमांनीही प्रकाशित केली आहे. काही प्रसारमाध्यमांनी मात्र या प्रसंगीही भारतविरोधी आणि राममंदिरविरोधी भाष्य केले आहे. या घटनेमुळे भारतातील मुसलमानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. (Ayodhya Rammandir)

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Park : पार्काच्या प्रवेशद्वाराजवळ उभारणार द्रोणाचार्यांचे स्मारक)

मुसलमानांच्या मनात त्यांच्या भविष्याची भीती वाढली

भारताच्या पंतप्रधानांनी पाडलेल्या मशिदीच्या जागी मंदिराचे उद्घाटन केले, अशा शब्दांत ब्रिटनच्या बीबीसीने (BBC) हिणवले आहे. कतारच्या ‘अल् जझीरा’ने (Al Jazeera) बातमीच्या मथळ्यात ‘मोदी यांनी केले श्रीराममंदिराचे उद्घाटन, मुसलमानांच्या मनात त्यांच्या भविष्याची भीती वाढली’ असे म्हटले आहे. अयोध्येतील एका मुसलमान महिलेचा हवाला देत ‘अल् जझीरा’ने लिहिले आहे, ‘मला टोमणे मारण्यात आले. मला पहाताच काही लोक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ लागले. त्यांच्यात आक्रमक विजयाची भावना होती.’

हिंदु राष्ट्रवादी राजकारणाच्या विजयाचे प्रतिबिंब

पाकिस्तानच्या ‘डॉन न्यूज’ने (Dawn News) लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मंदिराचे उद्घाटन केले जे हिंदु राष्ट्रवादी राजकारणाच्या विजयाचे प्रतिबिंब आहे. सोनेरी पोशाखातील मोदी यांनी श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी स्थापित केली. ज्या ठिकाणी शतकानुशतके जुनी मशीद उभी होती त्या जागेवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. जी वर्ष १९९२ मध्ये मोदी यांच्या पक्षाच्या भडकावण्यामुळे लोकांनी पाडली.

२० कोटी मुसलमानांमध्ये भीती निर्माण झाली

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने (The New York Times) ‘पंतप्रधान मोदी यांच्या ‘हिंदु प्रथम’ भारताचा विजय आहे’, असे म्हटले आहे. पुढे म्हटले की, भारतात हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट मोदी यांनी पूर्ण केले; मात्र देशातील २० कोटी मुसलमानांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भारताच्या हिंदु उजव्या विचारसरणीच्या पक्षाने देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनण्यासाठी श्रीराममंदिर आंदोलन प्रारंभ केले. २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ७० एकरांवर बांधलेल्या श्रीराममंदिराला पंतप्रधान मोदी यांचे तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्याकडे पाहिले जात आहे, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे.

सी.एन्.एन्.ने लिहिले आहे की, भारताच्या मोदी यांनी वादग्रस्त मंदिराचे उद्घाटन केले. भारतातील लाखो लोकांनी घरी दूरदर्शनवर श्रीराममंदिराचे उद्घाटन पाहिले. या मंदिरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचाराला चालना मिळणार आहे.  (Ayodhya Rammandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.