MLA Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयाकडे रवाना, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी

याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असून अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं सादर करणार आहोत.

124
MLA Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयाकडे रवाना, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी
MLA Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयाकडे रवाना, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी

बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची बुधवारी ईडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. यामुळे त्यांच्या चौकशीआधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पक्ष कार्यालयासमोर मोठ्या संख्यने गर्दी केली तसेच त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी आणि घोषणाबाजीही सुरू आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असून अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं सादर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन येतो आणि त्यानंतरच बोलतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Ayodhya Pranapratistha ceremony: अयोध्येत पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन, भाविकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार )

आमदार रोहित पवार हे ईडी कार्यालयात जाण्यासाठी मुंबईत हॉटेलमधून निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईडी कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन केलं जात आहे तसेच ईडी चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार हे ईडी कार्यालयाशेजारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राहणार आहेत. येथे रोहित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

ईडी कार्यालयात जाण्याआधी रोहित पवार म्हणाले की, अधिकारी त्यांचे काम करत असतात. आजपर्यंत जी माहिती मागितली ती पुन्हा एकदा देईन. अधिकारी त्यांचं काम करतायत पण त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे, ईडी अधिकाऱ्यांना आम्ही सर्व माहिती दिली आहे. CID, EOW आणि ईडीलासुद्धा माहिती दिलीय. आता मी स्वत: ईडीसमोर जाणार आहे.

लोकांसाठी काय करायचं याचा विचार करेन…

आम्ही चूक केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय? तिथं जर मोकळा वेळ मिळाला तर लोकांसाठी काय करायचं याचा विचार करेन. तिथून आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने लोकांसाठी काम सुरू ठेवेन असे रोहित पवार यावेळी म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.