Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

Nagar-Kalyan Highway Accident : २४ जानेवारीच्या पहाटे कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

227
Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

२४ जानेवारीच्या पहाटे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण (Kalyan)-नगर महामार्गावर हा अपघात झाला आहे. (Nagar-Kalyan Highway Accident)

(हेही वाचा – Mira Road Naya Nagar : नया नगरचे पाकिस्तान होऊ देणार नाही; आमदार नितेश राणे आक्रमक)

ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात धडक 

पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली आहे. कल्याण-नगर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्याजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

(हेही वाचा – Gnanavapi and Shahi Eidgah Masjid : मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी; पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती)

वाहतूक सुरळीत

जखमींना उपचारांसाठी पारनेर (Parner) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती; मात्र आता वाहतूक सुरळीत झाली आहे. (ACCIDENT NEWS)

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. (Nagar-Kalyan Highway Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.