ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार रोहीत शर्मा (Rohit Sharma) आणि त्याचा संघ सहकारी मंगळवारी सकाळी इंग्लंड (England) विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी हैद्राबादला (Hyderabad) दाखल झाला. (Ind vs Eng 1st Test) पण, सगळीकडे चर्चा एकच होती, विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटींत विश्रांती घेतोय, मग त्याच्या ऐवजी कोण खेळणार आणि विराटची मोठी जागा कोण भरून काढणार?
पण, खुद्द खेळाडूंकडे याचा विचार करण्यासाठी फार वेळ नव्हता. कारण, विराट नसेल, तर फलंदाजीची जबाबदारी इतरांवर येऊन पडणार. त्यामुळे सगळे लगेच कामाला लागलेले दिसले. बीसीसीआयने (BCCI) संघाचा हैद्राबादमधील पहिला सरावाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि यात खेळाडू प्रामुख्याने फलंदाजीचाच सराव करताना दिसले. आणि त्यानंतर खेळाडूंनी एकत्र येऊन क्षेत्ररक्षणाच्या कसरती केल्या.
‘पहिल्या कसोटीची जवळ जवळ वेळ झाली असता,’ असं बीसीसीआयने या संदेशात म्हटलंय.
When it’s almost “time” for the first Test ⏳#TeamIndia | #INDvENG | @IDFCFirstBank pic.twitter.com/QbswZ1AMWZ
— BCCI (@BCCI) January 23, 2024
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटींत खेळणार नाहीए. त्यासाठी त्याने वैयक्तिक कारण दिलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही बातमी देताना विराटने निर्णय घेताना कर्णधार रोहीत शर्मा आणि संघ प्रशासनाला विश्वासात घेतल्याचं म्हटलं होतं. तसंच मालिकेपूर्वीच विराटने सुटी घ्यावी लागू शकते, अशी आगाऊ माहिती दिली होती.
बीसीसीआय विराटच्या ऐवजी बदली खेळाडूची घोषणा करू शकतं. तसंच विराट नसताना आता श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कसोटी संघातील जागा कायम मानली जात आहे. त्यामुळे रोहीत शर्मा, यशस्वी जयसवाल त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर किंवा के एल राहुल अशी क्रमवारी भारतीय संघाची असू शकते. (Ind vs Eng 1st Test)