- ऋजुता लुकतुके
कोव्हिड आणि त्यानंतर भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे बीसीसीआयने (BCCI) २०१९ हंगामापासून वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला नव्हता. पण, ती कसर त्यांनी मंगळवारी रात्री भरून काढली. २०१९ च्या हंगामापासून ते आतापर्यंतचे पुरस्कार त्यांनी हैद्राबादमध्ये एका देखण्या सोहळ्यात देऊ केले. यात माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याला सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तो क्षण भावूक होण्याचा होता. (BCCI Annual Awards)
खुद्द रवी शास्त्रीही भारावला होता. त्याच्याबरोबर फारुख इंजिनिअर यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रवी शास्त्री १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू होता. तर १९८५ मध्ये त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हे बिरुद मिळालं होतं. बेरकी कर्णधार म्हणूनही तो प्रसिद्ध होता. (BCCI Annual Awards)
🗣️🗣️ 𝙄𝙩’𝙨 𝙖 𝙫𝙚𝙧𝙮 𝙩𝙤𝙪𝙘𝙝𝙞𝙣𝙜 𝙢𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙛𝙤𝙧 𝙢𝙚@RaviShastriOfc on winning the Col. C.K. Nayudu Lifetime Achievement Award 🏆👌#NamanAwards pic.twitter.com/WHCpKHo3SJ
— BCCI (@BCCI) January 23, 2024
तर फारुख इंजिनिअर यष्टीमागे चपळ यष्टीरक्षण करण्यासाठी प्रसिद्ध. आणि प्रेक्षकांच्या फर्माइशीवर षटकार ठोकणारे म्हणून लोकांचे लाडके. मुंबईत एकदा षटकार ठोकून त्यांनी स्टेडिअमवरील जुनं घड्याळ फोडलं होतं. या दोघांना बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (BCCI Annual Awards)
रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मागची ४० वर्षं आधी खेळाडू आणि मग प्रशिक्षक म्हणून सक्रिय काम केलं आहे. या प्रवासाविषयी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘मी बीसीसीआयला (BCCI) वाढताना बघितलं. आणि खेळाडूंच्या मागे उभं राहताना बघितलं. मला त्यांनी क्रिकेटचा मार्ग दाखवला. सुरुवातीला आमच्या काळात पैसा नव्हता. पण, देशासाठी खेळण्याची प्रतिष्ठा मोठी होती. आता खेळात सगळंच आलंय. आणि खेळ मोठा झालाय.’ (BCCI Annual Awards)
(हेही वाचा – ED raid on Sheikh Shahjahan : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरी छापेमारी)
हैद्राबाद इथं झालेल्या बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात कुणा कुणाला पुरस्कार देण्यात आले ती यादी पाहूया,
कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार (२०१९-२०) : रवी शास्त्री, फारुख इंजिनिअर
पॉली उम्रीगर सर्वोत्तम पुरुष खेळाडू : शुभमन गिल (२०२२-२३), जसप्रीत बुमरा (२०२१-२२) , रवीचंद्रन अश्विन (२०२०-२१) व मोहम्मद शामी (२०१९-२०)
सर्वोत्तम महिला खेळाडू : दीप्ती शर्मा (२०२२-२३, २०२१-२२) स्मृती मंढाना (२०२०-२१, २०१९-२०)
आंतरराष्ट्रीय पदार्पण, पुरुष : मयंक अगरवाल (२०१९-२०), अक्षर पटेल (२०२०-२१), श्रेयस अय्यर (२०२१-२२) व यशस्वी जयसवाल (२०२२-२३)
आंतरराष्ट्रीय पदार्पण, महिला : प्रिया पुनिया (२०१९-२०), शेफाली वर्मा (२०२०-२१), एस मेघना (२०२१-२२) व अमनज्योत कौर (२०२२-२३)
दिलिप सरदेसाई पुरस्कार : सर्वाधिक धावा – यशस्वी जयसवाल, सर्वाधिक बळी – आर अश्विन
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा, महिला : पूनम राऊत (२०१९-२०), मिथाली राज (२०२०-२१), हरमनप्रीत कौर (२०२१-२२) व जेमिमा रॉडरिग्ज (२०२२-२३)
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी, महिला : पूनम राऊत (२०१९-२०), झुलन गोस्वामी (२०२०-२१), राजेश्वरी गायकवाड (२०२१-२२), देविका वैद्य (२०२२-२३) (BCCI Annual Awards)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community