- ऋजुता लुकतुके
आयसीसीने (ICC) मंगळवारी २०२३ साठीचे सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केले आहेत. यात एकदिवसीय संघात कप्तानी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर त्याच्याखेरिज भारताचे आणखी ४ खेळाडू या संघात आहेत. त्याचवेळी कसोटी संघावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लिश खेळाडूंचं वर्चस्व आहे. या संघात अश्विन आणि जडेजा या दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. (ICC Test Team)
आयसीसीच्या कसोटी संघाचं कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलं आहे. तर वर्षभर भन्नाट फॉर्ममध्ये असलेले केविन विल्यमसन, जो रुट, उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने हे फलंदाज संघात आहेत. (ICC Test Team)
रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बोर्डर-गावसकर चषकात २५ बळी टिपत चांगली कामगिरी केली होती. शिवाय फलंदाजीतही त्याने उपयुक्त योगदान दिलं. त्याच्या जोरावर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने संघात स्थान मिळवलं आहे. तर रवी जाडेजाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेली दमदार कामगिरी त्याच्या मदतीला आली आहे. (ICC Test Team)
भारताने बोर्डर-गावसकर चषक आपल्याकडे राखला त्यासाठी जडेजाने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या यशात हातभार लावला होता. नागपूर कसोटीत डावात पाच बळी आणि अर्धशतक तर पुढील कसोटीत दोन्ही डावांत मिळून १० बळी अशी त्याची कामगिरी होती. (ICC Test Team)
Australia dominate the ICC Men’s Test Team of the Year 2023 🇦🇺
Details ➡️ https://t.co/O55M9FWe8E pic.twitter.com/LhiF2UEctk
— ICC (@ICC) January 23, 2024
(हेही वाचा – SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ‘हा’ फायदा)
ऑस्ट्रेलियाचा फटकेबाज फलंदाज ट्रेव्हिस हेडला एकदिवसीय तसंच कसोटी संघातही स्थान मिळालं आहे. आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. गोलंदाजीत आयसीसीने (ICC) मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉडला पसंती दिली आहे. तर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीही संघात आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण ५ खेळाडू कसोटी संघात आहेत. (ICC Test Team)
आयसीसीचा २०२३ साठीचा संघ असा असेल,
आयसीसी २०२३ कसोटी संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), जो रुट (इंग्लंड), ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), ॲलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया), रवीचंद्रन अश्विन (भारत), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) व स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) (ICC Test Team)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community