पुण्यातील बहुतेक करमणूक आणि जल उद्याने (Water Park) ही जलतरण तलाव, उपहारगृहे, करमणूक, साहसी सहल आणि थीम पार्क याद्वारे कुटुंबिय आणि मित्रमंडळीसोबत उत्तम वेळ घालवण्यासाठी आदर्श ठिकाणे आहेत. आपल्या प्रियजनांसोबत येथे घालवलेला वेळ संस्मरणीय ठरू शकेल. येथील सुशोभिकरण वैशिष्ट्यपूर्ण असून वातावरणही आनंददायी असल्याने लहान मुलांसाठीही ही जल उद्याने फायदेशीर ठरतात. (Water Park In Pune)
पुण्यातील वॉटर पार्कचे वेगळे असे की, ती विशाल पर्वतरांगांमध्ये वसलेली आहेत. पुणे शहर वर्षभर गर्दीने भरलेले असते. हल्ली प्रत्येक जण आपआपल्या कामांत व्यस्त असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबिय मुलांसोबत अविस्मरणीय आठवणी जपण्यासाठी या वॉटर पार्कना भेट देता येईल. मुख्य म्हणजे फक्त पुण्यातील नागरिकांकरिताच नाही, तर जगभरतील पर्यटकांमध्येही पुण्यातील वॉटर पार्क नैसर्गिक उपचार आणि ध्यानधारणेकरिता लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया पुण्यातील अशा काही खास वॉटर पार्कविषयी – (Water Park In Pune)
इमॅजिका अॅडलॅब्स
इमॅजिका अॅडलॅब्स हे भारतातील मुलांसाठीचे सर्वोत्तम वॉटर पार्कपैकी एक मानले जाते. २०१३ साली हे वॉटर पार्क सुरू झाले त्यानंतर काही महिन्यांतच ते कुटुंबीय आणि मुलांच्या आवडीचे बनले. मुंबई-पुणे महामार्गावर हे वॉटर पार्क आहे. येथे मनोरंजनाच्या सर्व उपक्रमांचा समावेश आहे. या जल उद्यानाचे सौंदर्य हे आहे की ते हिरव्यागार दऱ्यांमध्ये वसलेले आहे. येथे अतिशय सुंदर निसर्ग दृष्ये पाहायला मिळतात. मुलांकरिताही येथे सहलीचे आयोजन करता येऊ शकते. हे उद्यान थीम पार्क, स्नो पार्क आणि वॉटर पार्क अशा वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहे याशिवाय येथे जादूचे कार्यक्रम, अॅक्रोबॅट्सचे थेट सादरीकरण आणि हिप-हॉप नृत्य यासारखे विविध उपक्रम आहेत. येथील वेडी रोलर कोस्टर राइड, नाइट्रोवर साहसी सवारी करण्याची संधी मिळते. झिप-झॅप स्लाइडमुळे पाण्याखालील जगाचा शोध घेण्याचा रोमांचकारी अनुभवही या वॉटर पार्कमध्ये घेता येऊ शकतो. (Water Park In Pune)
वेळ – १०:३० पासून ६:३० पर्यंत.
प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ५९९ रुपये आहे.
अप्पू घर
लहान मुलांना पुण्यातील कोणत्या वॉटर पार्कमध्ये घेऊन जावे, असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा ‘अप्पू घर’ हे येथील विश्वसनीय वॉटर पार्क आहे. अप्पू घर ही प्रत्येकासाठी बालपणातल्या आठवणीत रमण्यासाठी एक आवडती जागा आहे. या वॉटर पार्कला ‘मिनी डिस्नेलँड ऑफ पुणे’ म्हणूनही ओळखले जाते. अप्पू घर येथे भेट देणे ही लहान मुलांसाठी पर्वणी आहे. अप्पू घर हे पुण्यातील मुलांसाठीच्या सर्वात जुन्या थीम पार्कपैकी एक आहे. याच्या बांधकामाला १९८९ साली सुरुवात झाली त्यानंतर ते १९९२ साली पूर्ण झाले. पर्यावरणपूरक निसर्गामुळे मनोरंजन आणि जल उद्यानाला सर्व वयोगटांतील लोक पसंती देतात. मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी येथील वातावरण प्रसन्न आणि आनंददायी आहे. अप्पू घर वॉटर पार्कमध्ये मेरी कप, स्ट्रायकिंग कार, भूत बांगला आणि टेली कॉम्बॅट या खेळांचा समावेश आहे. (Water Park In Pune)
वेळ – दुपारी १२.०० ते ८.०० पर्यंत.
प्रवेश शुल्क प्रौढांसाठी ३५० रुपये आणि मुलांसाठी ३०० रुपये.
डायमंड वॉटर पार्क
कधी पुण्यात गेलात, तर डायमंड वॉटर पार्क पाहायला विसरू नका. वॉटर पार्क हे सर्व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आकर्षण आहे. येथे कुटुंब, मुले आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तीव्र उन्हाळ्यापासून आराम मिळावा म्हणून बहुतेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबे या जल उद्यानाला भेट देतात. डायमंड वॉटर पार्क हे कौटुंबिक मेळावे, सहली, मेजवानी, वाढदिवसाच्या आणि वर्धापन दिनाची मेजवानी आयोजित करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे आगाऊ आरक्षणदेखील केले जाऊ शकते. पुण्यातील मुलांसाठीच्या वॉटर पार्कमध्ये मुलांसाठी भरपूर राइड आणि स्लाइड उपलब्ध आहेत. निवास, भोजन आणि करमणुकीची सोय केली जाईल. मुलांना आकर्षित करणारी वेव्ह पूल, किडीज पूल, एक समर्पित कौटुंबिक प्ले स्टेशन आणि विविध प्रकारच्या वॉटर स्लाइड्स आहेत. यामध्ये मुले खूप मजा करतात. तुमची मुले झॉर्बिंग, तिरंदाजी आणि रॉक क्लाइम्बिंग यासारख्या विविध उपक्रमांमध्येही भाग घेऊ शकतात. डायमंड वॉटर पार्कला भेट दिल्यावर येथील वॉटर पार्कमधील नवीन साहसी खेळांमुळे एक मजेदार अनुभव नक्कीच घेता येईल. (Water Park In Pune)
वेळ – १०.०० ते ५.३०
प्रवेश शुल्क सोमवार ते शुक्रवार –
प्रौढ- रुपये १,१७९
मुले- रुपये १,०६०१
मंगळवार ते बुधवार –
प्रौढ- रुपये ९४३
लहान मुले – रुपये ८२५
सेंटोसा रिसॉर्ट्स आणि वॉटर पार्क
सेंटोसा रिसॉर्ट्स आणि वॉटर पार्कचे चैतन्यमय आणि रंगीबेरंगी वातावरण अवर्णनीय आहे. शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी येथे जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सेंटोसा रिसॉर्ट्स आणि वॉटर पार्क उन्हाच्या काहिलीवर मात करण्यासाठी, थंड आणि आरामदायी मार्गांपैकी एक आहे. हे वॉटर पार्क पुणे-बंगळुरू बायपास महामार्गावर असल्याने, विशेषतः आठवड्याच्या सहली, कौटुंबिक सुट्ट्या, कॉर्पोरेट पार्ट्या इत्यादींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. छोट्या मुलांना येथील वेव्ह पूलमध्ये मजा येते. रेन डान्स, डीजे, कूल स्प्लॅश आणि बरेच पर्याय येथे उपलब्ध आहेत. पुण्यातील जल उद्यान मुलांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथील लँडिंग पूल पाहण्यास विसरू नका, कारण हा छोट्या जलतरणपटूंसाठी खास तयार केलेला पूल आहे. त्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्टीचा जास्तीत जास्त फायदा सेंटोसा रिसॉर्ट्स आणि वॉटर पार्कमध्ये घेता येईल. (Water Park In Pune)
वेळ – १०.०० पासून ६.०० पर्यंत.
प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ४०० रुपये आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation Survey : सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन)
कृष्णाई वॉटर पार्क आणि रिसॉर्ट
पुण्यातील मुलांसाठीच्या टॉप ५ वॉटर पार्कच्या यादीत समाविष्ट असणारे वॉटर पार्क म्हणजे कृष्णाई वॉटर पार्क अँड रिसॉर्ट. येथील परिसर हिरवागार असून १० एकर परिसरात हे पार्क वसलेले आहे. कृष्णाई वॉटर पार्क अँड रिसॉर्ट हे पुणेजवळील डोंजे गाव-सिंहगड मार्गावर आहे. नेत्रदीपक निसर्ग दृष्यांनी हा परिसर येथे आलेल्या पर्यटकांना आकर्षित करतो. डोंगरांचे आणि सभोवतालच्या हिरवळीचे नेत्रदीपक दृश्ये दाखवणारे हे या भागातील मुलांसाठी सर्वात लोकप्रिय आणि उत्तम प्रकारे बांधलेले पाणी आणि करमणूक उद्यानांपैकी एक मानले जाते. मुलांसाठीच्या वॉटर पार्कमध्ये मुले आणि प्रौढांसाठी असंख्य सहली आणि मनोरंजनात्मक उपक्रम उपलब्ध आहेत. येथील व्हिडिओ गेम पार्लर, वेगवान गाड्या, बैलांच्या सवारी या खेळांमुळे पर्यटक येथे रमतात ट्विस्टर, ब्लॅक होल, वेव्ह पूल, पायरेट आयलंड, असे लहान मुलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण खेळ येथे आहेत. (Water Park In Pune)
वेळ – १०.०० पासून ६.०० पर्यंत.
प्रवेश शुल्क मुलांसाठी ५०० रुपये आणि प्रौढांसाठी ६०० रुपये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community