राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज बुधवारी ईडी (ED) चौकशी होत असून त्यांना ईडी कार्यालयापर्यंत आत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या कार्यकर्त्यांसह सोडायला गेल्या. तर शरद पवार (Sharad Pawar) हे जवळच असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात (NCP office) बसून राहणार आहेत. रोहित यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर समर्थन देण्यामागे ‘काही अदृश्य शक्तींपासून दूर’ ठेवण्याचा अट्टाहास तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. (Rohit Pawar)
छत्रपती शिवाजी महाराज, संविधान फलकाला पुष्पहार
रोहित पवार यांनी ईडी (ED) कार्यालयात जाण्यापूर्वी नजीकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली, त्यांचे चरणस्पर्श केले आणि पक्षाच्या अन्य नेत्यांशीही चर्चा केली. तसेच विधानभवनालाही भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व भारतीय संविधानाच्या फलकाला पुष्पहार अर्पण केला. (Rohit Pawar)
(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी)
सुप्रियाताईंचे चरणस्पर्श
रोहित पवार ईडी (ED) कार्यालयात दाखल होण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. सुळे यांनी रोहित पवार यांना तपास यंत्रणेच्या कार्यालयापर्यंत साथ दिली तर प्रवेश करण्यापूर्वी रोहित यांनी सुळे यांच्या पायाला स्पर्श केला. राज्यभरातून येथे आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील पक्ष कार्यालयात जमले. त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत ईडीचा निषेध केला. (Rohit Pawar)
जयंत पाटलांच्या वेळी फक्त कार्यकर्ते
राष्ट्रवादीचे नेते, प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील (Jayant Patil) यांची मे २०२३ मध्ये इडी चौकशी झाली. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यां शिवाय त्यांना पाठींबा देण्यासाठी एकही नेता ईडी (ED) कार्यालयापर्यंत सोडा, जवळच असलेल्या पक्ष कार्यालयातदेखील उपस्थित नव्हता. हा भेदभाव रोहित यांच्या निमित्ताने उघड झाला. पवार कुटूंबातील एक प्रमुख नेता (रोहित) ‘अदृश्य शक्तीं’च्या मोहात पडू नये, यासाठी तर नाही ना? असा सवाल केला जात आहे. (Rohit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community