Republic Day Quotes : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार

1260
Republic Day Quotes : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार
Republic Day Quotes : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. (Republic Day Quotes) १९४७ मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले, तरी २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना अमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय तत्त्वज्ञ, क्रांतीकारक, राजकीय नेते यांचे काही प्रेरणादायी विचार !

(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी)

१. शेतकऱ्यांच्या झोपडीतून नवा भारत उदयाला येऊ द्या ! – स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)

२. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! – लोकमान्य टिळक (Lokmanya Balgangadhar Tilak)

३. जर अजूनही तुमचे रक्त तापत नसेल, तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारे पाणी आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी नसेल, तर तरुणांचा उत्साह कशासाठी ? – चंद्रशेखर आझाद (Chandra Shekhar Azad)

४. मला वाटते की, राज्यघटना व्यवहार्य आहे. ती लवचिक आहे आणि शांततेच्या काळात आणि युद्धकाळात देशाला एकत्र ठेवण्यासाठी पुरेशी मजबूत आहे. खरे तर मी असे म्हणू शकेन, काही चुकीचे घडले, तर त्याचा अर्थ असा नाही की, राज्यघटनेमुळे गोष्टी चुकीच्या झाल्या. ती एक मानवी चूक असू शकते. – घटनाकार बाबासाहेब आंबेडकर (B R Ambedkar)

५. मी समाजाच्या प्रगतीचे मोजमाप महिलांनी साध्य केलेल्या प्रगतीच्या प्रमाणावरून करतो. – घटनाकार बाबासाहेब आंबेडकर (B R Ambedkar)

६. प्रत्येक भारतियाने आता हे विसरले पाहिजे की, तो राजपूत, शीख किंवा जाट आहे. तो भारतीय आहे, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. – सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel)

(हेही वाचा – Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप)

७. भारतात शूर तरुण पुरुष आणि महिलांची कमतरता नाही. जर त्यांना संधी आणि मदत मिळाली, तर आपण अंतराळ संशोधनात इतर देशांशी स्पर्धा करू शकतो. – अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)

८. देण्याचे धाडस, वेगळा विचार करण्याचे धाडस, शोधण्याचे धाडस, अशक्य गोष्टींचा शोध घेण्याचे धाडस, अज्ञात मार्गावर प्रवास करण्याचे धाडस, ज्ञान सामायिक करण्याचे धाडस, वेदना दूर करण्याचे धाडस, पोहोच नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे धाडस, समस्यांचा सामना करण्याचे धाडस आणि यशस्वी होणे हे युवकांचे गुण आहेत. – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.