Delhi Winter : कडाक्याची थंडी… भूकंपाचे धक्के…. धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ

उंचावरील परिसरांमध्ये सातत्याने पारा घसरत आहे. ज्यामुळे उत्तर भारतासह देशातील मध्य आणि पूर्व भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. बिहारमध्ये तर थंडीची मोठी लाट आलीये. थंडी एवढी वाढली आहे की, ऊन हे कधीतरीच दिसतंय. हरियाणा, उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी आहे.

199
Delhi Winter : कडाक्याची थंडी... भूकंपाचे धक्के.... धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ
Delhi Winter : कडाक्याची थंडी... भूकंपाचे धक्के.... धुकेच धुके आणि वाढते प्रदूषण; दिल्लीकरांच्या काळजीत वाढ

प्रचंड कडाक्याची थंडी… दिवसभर असलेल्या धुक्यामुळे दिसत नसलेला रस्ता… आणि वाढते प्रदूषण कमी होते की काय भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीकरांच्या काळजीत निश्चितच वाढ झाली आहे. मागील महिनाभर अशाच वातावरणात दिल्लीकर श्वास घेत आहेत. मात्र काल मंगळवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याने दिल्लीकर चांगलेच हादरले. थंडी बाहेर पडू देत नाही आणि भूकंप घरात बसु देत नाही, अशीच काहीसी अवस्था राजधानी वासियांची आहे. (Delhi Winter)

वर्षातून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. अगदी काल मंगळवारी रात्री जाणवलेल्या भूकंपामुळे देखील बरेच लोक घराबाहेर निघाले होते. तर दुसरीकडे कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे देखील दररोज विविध अडचणीत वाढ होत आहे. एकीकडे दिवसभर पडणारे धुके आणि थंडीमुळे दिवसभर वातावरणात बराच गारवा असतो. देशभरात थंडीचा प्रकोप सुरुच आहे. उंचावरील परिसरांमध्ये सातत्याने पारा घसरत आहे. ज्यामुळे उत्तर भारतासह देशातील मध्य आणि पूर्व भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. बिहारमध्ये तर थंडीची मोठी लाट आलीये. थंडी एवढी वाढली आहे की, ऊन हे कधीतरीच दिसतंय. हरियाणा, उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी आहे. (Delhi Winter)

(हेही वाचा – Satwik-Chirag No 1 : सात्त्विकसाईराज, चिराग जोडीचा पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा)

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत थंडी कायम राहणार – हवामान विभाग

हवामान विभागाने माहिती दिली की, बुधवारी दिल्ली, नोएडा, गाजियाबादसह इतर भागांमध्ये किरकोळ पाऊस झाला. यामुळे थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्य आणि उत्तर दिल्लीमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरात कडाक्याची थंडी पडतेय. बिहारमध्ये सध्या शीतलहर आलीये. ऊन पडत नसल्याने आणि हवेचा वेग जास्त असल्याने लोकांना थंडीचा सामना करावा लागतोय. येथील अनेक भागात कडाक्याच थंडी पडलीये. सध्या तरी या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. तसंच हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातही थंडी कायम आहे.  खरं तर संक्रांती नंतर थंडीची लाट ओसरते. मात्र यावर्षी ओसरणारी थंडीची लाट दिल्लीत ठाण मांडून बसलेली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत थंडी कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. (Delhi Winter)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.