लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ‘इंडी’ आघाडीला जोरदार धक्का दिला. आम्ही ‘इंडी’ आघाडीत आहोत, पण आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. देशात काय होईल माहित नाही, पण राज्यात भाजपाला केवळ आम्हीच हरवू शकतो, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहे. त्यातच भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजपविरोधी सर्व राजकीय पक्ष इंडी आघाडीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. मात्र आता जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसला लोकसभेच्या केवळ २ जागा देऊ, असे म्हटले. जे काँग्रेसच्या पचनी पडले नाही.
(हेही वाचा ED raid on Sheikh Shahjahan : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरी छापेमारी)
काय म्हटल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला विरोध करत म्हटले की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये , आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.
काय म्हटले काँग्रेसने?
यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले, ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) वगळून ‘ इंडी’ आघाडीची कल्पना करता येणार नाही. ममता बॅनर्जी ह्या ‘इंडी’ आघाडीचा महत्त्वाचा भाग आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यामध्ये काही गतिरोधक येतातच. मात्र त्यातून काही ना काही मार्ग काढला जाईल.
Join Our WhatsApp Community