युक्रेनचे ६५ युद्धकैद्यांना घेऊन जात असलेले रशियाचे लष्करी वाहतूक विमान बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी युक्रेनजवळील रशियन प्रदेशात कोसळले. पश्चिम बेलग्रूड प्रदेशात हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. तसेच अद्याप यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. (Russian Plane Crash)
आयएल- ७६ हे मालवाहतूक करणाऱ्या विमानाला हा अपघात झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार विमानात युक्रेनचे ६५ युद्धबंदी होते.हे सर्वजण युक्रेन लष्कराचे कर्मचारी होते. या युद्धबंदींना बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपविण्यासाठी नेण्यात येत होते. या युद्धबंदींसह सहा क्रू सदस्य होते.(Russian Plane Crash)
🚨🇷🇺Russian military plane crashes in Belgorod region, many feared dead
Note–raw video update#Russia #planecrash #Belgorod #BreakingNews #JUSTIN pic.twitter.com/HyGKtSd7cL— EUROPE CENTRAL (@europecentrral) January 24, 2024
मास्कोतील वेळेनुसार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली की नाही याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही.या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून निवासी भागाजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळले असल्याचे दिसून येत आहे. यात आगीचे प्रचंड लोळ उठले असल्याचे दिसत आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या दीड वर्षापासून युद्ध सुरू आहे. मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community