- वंदना बर्वे
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची स्थापना झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आता संपूर्ण देशातील लोकांसाठी ‘श्रीराम जन्मभूमि दर्शन अभियान’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) बुधवारी (२४ जानेवारी) अयोध्येला जाणार असून ते या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) बुधवार २४ जानेवारीला देशभरातील लोकांसाठी ‘श्रीराम जन्मभूमि दर्शन अभियान’ सुरू करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामललाची स्थापना झाली. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वांसाठी राम मंदिर सुरू करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जात आहेत. (Ayodhya Ram Mandir)
अशातच, भारतीय जनता पक्षाने (BJP) संपूर्ण देशातील लोकांसाठी ‘श्रीराम जन्मभूमि दर्शन अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम उद्या म्हणजे गुरुवार, २५ जानेवारी पासून राबविली जाणार आहे. देशातील सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघातील लोकांना दर्शनाचे निमंत्रण दिले जाणार आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिरासाठी काय काय प्रयत्न केले याची माहिती दिली जाणार आहे. शिवाय, विरोधी पक्ष या कार्यात कशी आडकाठी निर्माण करीत आहेत हेही सांगितले जाणार आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Mamata Banerjee : देशात काय होईल माहित नाही, पण आम्ही स्वबळावरच लढणार; काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?)
महत्वाचा मुद्या असा की, भाजपचे (BJP) कार्यकर्ते दर्शनाचे निमंत्रण देऊन थांबणार नाही आहेत तर, प्रत्येक दर्शनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची जेवण, निवास आणि वैद्यकीय अशी संपूर्ण व्यवस्था केली जाणार आहे. भाजप (BJP) हायकमांडने ही जबाबदारी जिल्हा युनिटकडे सोपविली आहे. भाजपचे (BJP) संघटन सरचिटणीस बी एल संतोष, सुनिल बंसल आणि विनोद तावडे या संपूर्ण मोहिमेवर नजर ठेवून राहणार आहेत. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community