-
ऋजुता लुकतुके
यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) अशी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातून सुटी घेतली होती ती २०२१ साली. त्याची मुलगी वामिकाच्या जन्माच्या वेळी. एरवी आपली तंदुरुस्तीही तो अगदी राखून असतो. थोडक्यात, विराट भारतीय संघात खेळत नाहीए, असे प्रसंग मूळातच विरळा. त्यातच ही इंग्लंड विरुद्धची मॅरेथॉन म्हणजे ५ कसोटींची मालिका आहे. आणि यातील पहिल्या दोन कसोटींना विराट मुकणार आहे.
त्यामुळे भारतीय ड्रेसिंग रुममध्ये विराटच्या नसण्याचीच चर्चा होणं स्वाभाविक आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही विराटची उणीव काय आहे हे मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. ‘त्याचे विक्रम आणि आकडेवारीच बोलकी आहे. तो सुरुवातीच्या कसोटी खेळणार नसेल, तर संघासाठी तो एक मोठा खड्डा आहे,’ असं द्रविड स्पष्टपणे म्हणाले.
त्यामुळे विराट नसताना आता इंग्लिश बॅझ-बॉल रणनीतीला सामोरं जाण्याचं आव्हान रोहित शर्माला (Rohit Sharma) परतावून लावायचं आहे. कारण, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे कसलेले फलंदाजही संघात नाहीएत. या सगळ्यांच्या अनुपस्थितीत रोहित, शुभमन, यशस्वी, श्रेयस, राहुल, जाडेजा यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयसला चौथ्या स्थानावर पुन्हा एकदा संधी मिळेल.
(हेही वाचा – Lok Sabha Elections : इंडी आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींचा ‘एकला चलो’ चा नारा)
पण, त्याच्यावर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा होईल. आणि तो खेळून काढण्याची कणखरता त्याने दाखवणं आवश्यक आहे.
हैद्राबादमध्ये बीसीसीआयच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भारतीय संघ काळे ब्लेझर घालून आला होता. आणि तेव्हाच्या बीसीसीआयने केलेल्या एका ट्विटमध्ये खेळाडू दिसतही होते रुबाबदार. आता संघाला असंच एकत्र येऊन खेळायचंय.
An evening of celebrating Indian Cricket and rewarding on-field excellence across generations ✨🏆
Here’s a recap of the #NamanAwards in Hyderabad 🎥🔽 – By @RajalArora https://t.co/04pmzOs45b
— BCCI (@BCCI) January 24, 2024
भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज घेऊन खेळणार हे जवळ जवळ निश्चित आहे. आणि हे तीन गोलंदाज अश्विन, जाडेजा आणि अक्षर असणार हे ही स्पष्ट आहे. यांच्या जोडीला जसप्रीत आणि सिराज यांना तेज गोलंदाजीची धुरा वाहायची असेल. पण, अश्विन आणि कंपनीवर इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल.
दुसरीकडे इंग्लिश संघही तीन फिरकी गोलंदाज घेऊन खेळण्याच्या तयारीत आहे. व्हिसामधील अडचणींमुळे त्यांचा एक फिरकीपटू शोएब बशिरला माघारी परतावं लागणार आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाहीए. पण, स्टुअर्ट ब्रॉड, गस ॲटकिनसन यांच्याबरोबरीने कर्णधार बेन स्टोक्सला गोलंदाजीची धुरा वाहावी लागणार आहे.
(हेही वाचा – Russian Plane Crash : ६५ युक्रेनियन युद्धकैद्यांना नेणारे रशियन वाहतूक विमान युक्रेनजवळ कोसळले)
तर फलंदाज बॅझ-बॉल क्रिकेट खेळणार हे त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. आणि फलंदाजीच या मालिकेत इंग्लंडचा तारणहार असणार आहे. जो रुट, बेन स्टोक्स, जिमी बेअरस्टो, ऑली पोप यांच्यासह झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामीवीरांकडून त्यांना आशा असतील.
कागदावर तुल्यबळ असे हे दोन संघ हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर समोर येतील तेव्हा इंग्लिश खेळाडू फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कशी कामगिरी करतात आणि भारतीय खेळाडू बॅझ-बॉल क्रिकेटला कसं सामोरं जातात यावर बरंच काही अवलंबून असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community