- ऋजुता लुकतुके
भारतातील सगळ्यात मोठी खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँकेनं क्रेडिट कार्ड क्षेत्रातही नवीन मापदंड सर केला आहे. २ कोटींपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरात किंवा सक्रिय असलेली ही पहिली भारतीय बँक ठरली आहे. बँकेनं एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. (HDFC Bank Credit Cards)
‘२००१ मध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डाच्या व्यवसायात आली. त्यानंतर १ कोटी क्रेडिट कार्डांचा टप्पा बँकेनं २०१७ साली गाठला. त्यानंतर ६ वर्षं आणि १ महिन्यात बँकेनं पुढील १ कोटी ग्राहकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आणि भारतात २ कोटी ग्राहकांचा टप्पा पूर्ण करणारी एचडीएफसी पहिली बँक आहे,’ असं कंपनीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. (HDFC Bank Credit Cards)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला चला!; भाजप ५४३ लोकसभा मतदारसंघात राबविणार मोहिम)
क्रेडिट कार्ड व्यवसायातील हिस्सेदारी पाहता तिथेही एचडीएफसी बँक आघाडीवर आहे. या व्यवसायातील भारतीय बाजारपेठेतील त्यांची हिस्सेदारी २८.६ टक्के इतकी आहे. त्या खालोखाल एसबीआय (SBI) कार्डाची हिस्सेदारी १८ टक्के इतकी आहे. ॲक्सिस बँकेची १३ टक्के तर कोटक महिंद्रा बँकेची हिस्सेदारी ५ टक्के आहे. (HDFC Bank Credit Cards)
कंपनीच्या रिटेल कर्ज उद्योगात क्रेडिट कार्डावरील कर्जाचा वाटा ८ टक्के आहे. आणि देशात महिन्याभरात सरासरी एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून होणारे व्यवहार हे सरासरी ३५,००० ते ४५,००० कोटी रुपयांचे आहेत. (HDFC Bank Credit Cards)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community