Chandrasekhar Bawankule: उदयनिधी स्टॅलिनचे मतं उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ? बावनकुळे यांचा सवाल

भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली, घराणेशाही नुसार मुख्यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर, भाजपावर टीका करण्याचा अधिकारच नाही.

200
Chandrasekhar Bawankule: उदयनिधी स्टॅलिनचे मतं उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ? बावनकुळे यांचा सवाल

सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (२४ जानेवारी) केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत आहेत. या विचारावरच जी इंडी आघाडी तयार झाली त्या आघाडीत हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सामील आहेत. उदयनिधींची सनातन हिंदू धर्माबद्दलची मते तुम्हाला मान्य आहेत का हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे असे आव्हानही.बावनकुळे यांनी यावेळी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बावनकुळे बोलत होते.(Chandrasekhar Bawankule)

बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली, घराणेशाही नुसार मुख्यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर, भाजपावर टीका करण्याचा अधिकारच नाही. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता, पक्ष,कार्यकर्ते सगळेच निसटले. उद्धव यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. म्हणूनच अस्वस्थ, विचलित मानसिक अवस्थेत उद्धव यांनी नाशिक इथे मोदीजी आणि भाजपा विरोधात गरळ ओकली असे बावनकुळे म्हणाले. (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा : Maharashtra सरकार मराठा समाजाला ‘आर्थिकदृष्ट्या मागास’ आरक्षण देण्याच्या तयारीत)

इंडी आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पवित्र्यामुळे फूट पडल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात एकीकडे इंडी आघाडीची शकले होताना दिसतील तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपा मध्ये पक्षप्रवेशाचा झंझावात दिसून येईल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. यावेळी भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशिष देशमुख, नव्याने पक्ष प्रवेश केलेले जळगावचे कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.