Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

387
दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पण आपल्याला स्वतःची राज्यघटना नव्हती. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला संविधान मिळाले. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि त्यासोबत भारत एक सार्वभौम राज्य झाले. म्हणून आपल्या देशाला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन का?

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून निवडला गेला, कारण या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९२९ साली ब्रिटीशांच्या वर्चस्वाचा निषेध करत ‘संपूर्ण स्वराज’ची घोषणा केली. २६ जानेवारी हा दिनांक ‘पूर्ण स्वराज’ या पहिल्या घोषणेचे प्रतीक आहे.

या दिवसाचे महत्व

डॉ. आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रजासत्ताक घोषित करण्यात आला, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या भावनेचे प्रतीक आहे. १९५० मध्ये या दिवशी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज घोषित केले. वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली गेली. या दिवशी भारतीय नागरिकांना आपले सरकार लोकशाही पद्धतीने चालवण्याची अनुमती देतो. भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते.

संविधान सभेचा इतिहास

१९३४ मध्ये एम.एन. रॉय यांनी भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार केला होता आणि त्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका झाल्या. १९४९ मध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी मान्य केली आणि डॉ. आंबेडकर यांची घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय राज्यघटना भारताच्या मूलभूत संरचना अधिनियम १९३५ वर आधारित आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.