Devendra Fadnavis : जलयुक्त शिवार अभियान २.० मधील कामे तातडीने पूर्ण करावी; देवेंद्र फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

201
Devendra Fadnavis यांचे भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र, म्हणाले...

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे),मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते. (Devendra Fadnavis)

उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या ५ जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Veer Savarkar : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सदिच्छा भेट)

इतक्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल. या वर्षात, आत्तापर्यंत, ५६५ तलावातून सुमारे ८३.३९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, ज्यामुळे जवळपास ६००० लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.