उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना हा समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सूरज चव्हाणला अटक झालेल्या प्रकरणात संदीप राऊत यांचीही होणार चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आले आहे. याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे. त्यामुळे संजय राऊतांची चिंता वाढलेली आहे.
काय आहे खिचडी घोटाळ प्रकरण?
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक केली. या प्रकरणात ईडीकडून (ED) पहिली अटक आहे. कोविड-१९ महामारी दरम्यान स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटपाशी संबंधित १ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात चव्हाण यांचा सहभाग असल्याचा संशय होता. या गुन्ह्यातील रक्कम चव्हाण यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रार अर्जाचा तपास करून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून यापूर्वी सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावले होते, त्याच बरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत, गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर, सुजित पाटकर यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community