Maratha Reservation : जरांगेंचा मोर्चा मुंबईत जाणार नाही ?; सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

397
Maratha Reservation : जरांगेंचा मोर्चा मुंबईत जाणार नाही ?; सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
Maratha Reservation : जरांगेंचा मोर्चा मुंबईत जाणार नाही ?; सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्ठ झाला आहे. गुरुवारी सकाळी मोर्चा पिंपरी चिंचवडमधून लोणावळ्यात पोहोचला. (Maratha Reservation) गुरुवारी सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे वचन दिले आहे. यामुळे जरांगे पाटील मोर्चा लोणावळ्यातच थांबणार असल्याचे समजते.

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघांदरम्यान रंगतील ही ३ द्वंद्व)

दुपारी ४ वाजेपर्यंत होणार निर्णय

जरांगे पाटील मुंबईत (Mumbai) येण्याऐवजी लोणावळ्यात (Lonavala) गुलाल उधळून मोर्चाची सांगता करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारने ४ वाजेपर्यंत वेळ मागितली आहे. या मागण्यांबाबत सरकारचा निर्णय दुपारी ४ वाजेपर्यंत अपेक्षित आहे. तो निर्णय आल्यानंतर मोर्चा लोणावळ्यात थांबवायचा कि नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारचा निर्णय येताच लोणावळ्यात गुलाल उडवणार असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्यावर माजी आमदार लक्ष्मण माने यांची टीका; म्हणाले…)

मनोज जरांगे पाटील यांचा नवी मुंबईत शेवटचा मुक्काम आहे. पनवेल (Panvel) येथे मनोज जरांगे आणि सहकारी आंदोलक यांच्या सोबत आसलेल्या सर्व आंदोलकांची रहाण्याची आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या शौचालयाची गैरसोय होऊ नये; म्हणून एपीएमसी बाजारात प्रशासनाने फिरत्या शौचालयांची व्यवस्थ केली आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.