Union Budget 2024 : अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याला हलवा समारंभाने प्रारंभ

221
Union Budget 2024 : अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याला हलवा समारंभाने प्रारंभ
Union Budget 2024 : अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याला हलवा समारंभाने प्रारंभ

हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 (Union Budget 2024) तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखला जाणारा हलवा समारंभ बुधवारी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे पार पडला. दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्याची “लॉक-इन” प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पारंपरिक हलवा समारंभ आयोजित केला जातो.

(हेही वाचा – War Games in Arabian Sea : अरबी समुद्रात भारतासह 50 देशांचे नौदल; चीनला आव्हान)

मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, यंदाचा हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 देखील कागदरहित असणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर केला जाणार आहे.

राज्य घटनेत विहित केल्याप्रमाणे, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाच्या मागण्या, वित्त विधेयक यांसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप” (Union Budget Mobile App) वर उपलब्ध असेल. डिजिटल सुविधेचा सर्वात सोपा प्रकार वापरून संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य लोकांना हे अर्थसंकल्प दस्तावेज सहज पाहता येतील. हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील हे अॅप डाउनलोड करता येईल.

(हेही वाचा – PM Narendra Modi and Emmanuel Macron : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरला पोहोचणार)

1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अॅपवर उपलब्ध होतील.

हलवा समारंभाला केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत वित्त आणि व्यय सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन (Dr. T.V. Somanathan), आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे (Tuhin Kanta Pandey), महसूल सचिव संजय मल्होत्रा, सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ चे अध्यक्ष नितीन गुप्ता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल (Sanjay Kumar Aggarwal), आणि अतिरिक्त सचिव (अर्थसंकल्प) आशिष वाछानी, तसेच अर्थसंकल्पाची तयारी आणि संकलन प्रक्रियेत सहभागी अर्थ मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.

समारंभाचा एक भाग म्हणून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसची देखील पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच तयारीचा आढावा घेतला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.