Jagadish Shettar : कर्नाटकमध्ये काँग्रेसला झटका; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपात

294
Jagadish Shettar : कर्नाटकमध्ये काँग्रेसला झटका; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपात
Jagadish Shettar : कर्नाटकमध्ये काँग्रेसला झटका; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपातJagadish Shettar : कर्नाटकमध्ये काँग्रेसला झटका; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपात

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांनी गुरुवार, २५ जानेवारी रोजी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जगदीश शेट्टर हे जुलै 2012 ते मे 2013 पर्यंत कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री होते.

(हेही वाचा – Water Cut : भांडुपकरांवर पुन्हा पाण्याचे संकट; गुरुवारी नसेल ‘या’ भागात पाणी)

2023 मध्ये केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश

शेट्टर हे कर्नाटकमध्ये राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या लिंगायत समुदायाशी संबंधित आहेत. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) वेळी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर हुबळी-धारवाड मध्यवर्ती मतदारसंघातून निवडणूक लढवली; परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

कॉंग्रेसचे शर्थीचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पुन्हा आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजप अथक प्रयत्न करत असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी नुकतेच सांगितले होते.

म्हैसूर जिल्ह्यातील बयालुकुप्पे येथे पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, “आता काँग्रेस (Congress) पक्षात असलेल्या शेट्टर यांच्या पुनरागमनासाठी अनेक भाजप नेते अथक प्रयत्न करत आहेत. हे पक्षातील कमकुवतपणाचे लक्षण आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत.” (Jagadish Shettar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.