- ऋजुता लुकतुके
भारताचा सध्याचा टी-२० प्रकारातील कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याने सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे. सूर्यकुमारला हा पुरस्कार जाहीर करताना आयसीसीने त्याची ओळख, ‘भारतीय टी-२० संघाच्या मधल्या फळीतील कणा,’ अशी करून दिली आहे. (Suryakumar Yadav)
या वर्षाच्या सुरुवातीला सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) श्रीलंके विरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली नव्हती. पहिल्या सामन्यात तर तो ७ वर बाद झाला. पण, त्यानंतर त्याच्या फलंदाजीचा गिअर पडला. आणि त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याची वर्षभरातील सरासरी ५० पेक्षा जास्त आणि स्ट्राईकरेट जवळ जवळ १५० इतका होता. (Suryakumar Yadav)
आयसीसीने त्याला टी-२० तील प्रभावशाली आणि सामन्याचा नूर पालटणारा फलंदाज म्हटलं आहे. (Suryakumar Yadav)
An arsenal of eclectic shots and a striking average 🔥
The India batter lit up 2023 to win the ICC Men’s T20I Cricketer of the Year award ✨https://t.co/XYqFZcqres
— ICC (@ICC) January 24, 2024
(हेही वाचा – Delhi Crime : पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; पुरावा नसताना शोधले आरोपी)
एकदिवसीय विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमारकडे (Suryakumar Yadav) भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आली. आणि अतिरिक्त दडपणात उलट त्याचा खेळ बहरलेला दिसला. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकून देण्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बरोबरी साधण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. (Suryakumar Yadav)
२०२३ मध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वेस्ट इंडिज विरुद्ध ८१ (४४) आणि ६१ (४५) अशा दोन संस्मरणीय खेळी खेळला. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध ५२ चेंडूंत ११५ धावा केल्या. यात ९ षटकार आणि ७ चौकार होते. (Suryakumar Yadav)
सध्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दक्षिण आफ्रिकेत मांडीच्या स्नायूच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. आणि आगामी आयपीएलमध्ये तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल अशी आशा आहे. (Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community