- ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्ट कंपनीने (Microsoft Company) आपला बिल गेट्स यांच्या काळातील लौकीक पुन्हा मिळवताना अमेरिकन शेअर बाजारात मोठी मुसंडी मारली आहे. नवीन वर्षांत कंपनीचं भागभांडवल ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचलं आहे. गेल्यावर्षी आयफोन बनवणारी ॲपल ही कंपनी ३ ट्रिलियन डॉलरच्या वर गेली होती. आता मायक्रोसॉफ्टनेही हा टप्पा ओलांडला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित चॅट जीपीटीमुळे कंपनीने ही मुसंडी मारल्याचं बोललं जातंय. (Microsoft USD 3 Trillion Company)
त्यामुळे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचं (Artificial Intelligence) कुतुहल शमलेलं नाही, तर ते उलट वाढतच जाणार आहे, असे संकेतही मिळत आहेत. (Microsoft USD 3 Trillion Company)
कारण, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या (Microsoft Company) समभागांना २०२३ मध्ये तब्बल ५७ टक्के जास्त मागणी दिसून आली. आणि अमेरिकन शेअर बाजाराच्या यशस्वी घोडदौडीचं श्रेय ज्या ७ कंपन्यांना दिलं जातं, त्यातील ही दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच ॲपल आहे. (Microsoft USD 3 Trillion Company)
Microsoft achieved a historic $3 trillion market valuation on Wednesday, in the latest example of how optimism over AI has fueled a seemingly unstoppable advance in the software giant. https://t.co/1oPpvsTXCo
— Bloomberg (@business) January 24, 2024
(हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू)
हे आहे मायक्रोसॉफ्टच्या यशाचे कारण
मायक्रोसॉफ्टने (Microsoft Company) गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये काही दिवसांसाठी भाग भांडवलाच्या निकषावर ॲपललाही मागे टाकलं होतं. पण, नवीन वर्षात सुरुवातीचे काही दिवस कंपनीचा शेअर थोडा खाली आला. आणि त्याचा फटका बसून कंपनी पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर गेली. (Microsoft USD 3 Trillion Company)
पण, बुधवारी अमेरिकन बाजारांमध्ये मायक्रोसॉफ्टचे शेअर दीड टक्क्यांनी वाढून ४०४ अमेरिकन डॉलरवर बंद झाले. आणि मायक्रोसॉफ्टचं भागभांडवल ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या पार गेलं. मायक्रोसॉफ्टने ओपन एआय (Open AI) या कंपनीबरोबर सहकार्य करार करून चॅट जीपीटी (Chat GPT) ही सेवा आपल्या संगणकावर लोकांना उपलब्ध करून दिली. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली उपलब्ध करून देण्यात घेतलेला पुढाकारच कंपनीला यश देऊन गेला आहे. (Microsoft USD 3 Trillion Company)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community