Veer Savarkar : धुळे जिल्हा कारागृहात वीर सावरकर कारावास मुक्तता शताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न….

या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी वर्ग आणि बंदीवानांसमोर एका बंदीवानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Veer Savarkar)  सात मिनिटे आपले भाषण सादर केले. त्यानंतर चंद्रशेखर साने दिग्दर्शित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सौजन्याने 'समाजक्रांतिकारकांची यशोगाथा : रत्नागिरी पर्व' हा माहितीपट सादर करण्यात आला. 

798

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई आयोजित आणि चंद्रशेखर साने यांच्या संकल्पनेने ६, ७ आणि ८ जानेवारी यादिवशी संपूर्ण देशभरात ‘सावरकर कारावास मुक्ती शताब्दी’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंगळवार, २३ जानेवारी रोजी धुळे शहरातील जिल्हा कारागृहात देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात धुळे जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले मुख्य अधीक्षक विशाल बांदल, कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी झंजूर्डे तसेच मुख्याध्यापक मनोहर भदाणे आणि सुभेदार चौबे या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रतिमेला एकूण ८५ बंदीवानांच्या उपस्थितीत पुष्पहार आणि फुले वाहून अभिवादन करण्यात आले. त्यापश्चात बदलापूरस्थित अनंत ओगले लिखित ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या नाटकातील ”स्वातंत्रलक्ष्मीचा पुत्र विनायक” ही ध्वनिफीत सादर करण्यात आली.

dhule

कारागृहातील बंदीवानाने केले भाषण 

या कार्यक्रमावेळी तुरुंगाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच उपस्थित बंदीवान यांत सादर करीत असलेल्या विलक्षण अशा या कार्यक्रमाची प्रचंड मोठी उत्सुकता दिसून आली. या कार्यक्रमात या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी वर्ग आणि बंदीवानांसमोर एका बंदीवानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Veer Savarkar)  सात मिनिटे आपले भाषण सादर केले. त्यानंतर चंद्रशेखर साने दिग्दर्शित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सौजन्याने ‘समाजक्रांतिकारकांची यशोगाथा : रत्नागिरी पर्व’ हा माहितीपट सादर करण्यात आला.  वीर सावरकर (Veer Savarkar) यांना अंदमान, अलिपूर, रत्नागिरी, येरवडा अशा विविध कारागृहात एका उदात्त ध्येयापोटी बंदिस्त करण्यात आले होते. अखेर ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांना संपूर्णपणे मुक्त करण्यात आले. जरी वीर सावरकर हे विविध कारागृहातील कारावासातून संपूर्णपणे मुक्त झाले असले तरी ते वर्ष १९२४ ते १९३७ या तेरा वर्षाच्या काळात रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते. या तेरा वर्षाच्या काळात त्यांनी वैविध्यपूर्ण अशा सामाजिक क्रांतीचा पाया रचला नि रुजविला.

(हेही वाचा Veer Savarkar : बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांसह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिन साजरा) 

कार्यक्रमाचे काय होता उद्देश?   

ब्रिटिशांच्या साखळदंडात अडकलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी केलेला अपरिमित त्याग, त्यांच्या ठायी ठायी असलेली राष्ट्रभक्ती, रत्नागिरीतील तेरा वर्षाच्या स्थानबद्धतेत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाण सर्वांना असावी, या उद्देशाने धुळे जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना कळावा, या हेतूने सादर करण्यात आला. शिरीष पाठक यांनी नागपूर येथील अनिल शेंडे लिखित ‘मृत्युंजय सावरकर’ या शीर्षकाचे ‘घे वंदन तव दास्याचा’ हे गीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. प्रस्तुत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळे जिल्हा कारागृहातील भदाणेगुरुजी यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शिरीष पाठक, गणेश वाडेकर, प्रमोद पवार, चि. निखिल संजय मांढरे, राजेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. उल्लेखनीय बाब अशी की, राजेश पाटील हे धुळे शहर पोलीस सेवेत कार्यरत आहे. त्यांचे या कामी विशेष असे सहकार्य लाभले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.