Shoaib Bashir Gets Visa : इंग्लिश खेळाडू शोएब बशिरला अखेर मिळाला भारतीय व्हिसा

शोएब बशिरला व्हिसा न मिळाल्यामुळे अगदी ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयानेही भारता विरोधात टिप्पणी केली होती. 

193
Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला
Shoaib Bashir Reaches India : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर अखेर भारतात पोहोचला
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडचा संघ भारतात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. या संघात निवड झालेला शोएब बशिर मात्र पहिली कसोटी सुरू झाली तरी भारतात येऊ शकला नव्हता. याला कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला भारताचा व्हिसा मिळाला नव्हता. शोएब बशिर हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू आहे. आणि तो इंग्लंडमध्ये सॉमरसेटकडून खेळतो. (Shoaib Bashir Gets Visa)

बशिरला व्हिसा न मिळाल्यामुळे पहिल्या कसोटीपूर्वी एक नवीन वाद सुरू झाला होता. शोएब पाकिस्तानी वंशाचा असल्यामुळे भारताकडून व्हिसासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप इंग्लिश संघाने केला होता. तर पाकिस्तानी वंशांच्या खेळाडूंना व्हिसा देण्यापूर्वी गृहमंत्रालयाचीही परवानगी लागते, अशी भारतीय इमिग्रेशन केंद्र आणि बीसीसीआयची भूमिका होती. (Shoaib Bashir Gets Visa)

पण, त्यामुळे इंग्लिश संघ आबूधाबीत सराव करत असताना शोएब बशिरला मात्र व्हिसा अभावी लंडनला परतावं लागलं होतं. आता बुधवारी उशिरा त्याला व्हिसा मिळाल्याचं इंग्लिश बोर्डानेच स्पष्ट केलं आहे. (Shoaib Bashir Gets Visa)

(हेही वाचा – Zee-Sony Merger Called Off : सोनीने करार एकतर्फी रद्द केल्यानंतर झी ची लवादाकडे धाव)

इंग्लंडमध्ये शोएबला मिळालेल्या वागणुकीबद्दल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात राग व्यक्त होत होता. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने शोएबला व्हिसा न मिळणं हे चीड आणणारं असल्याचं म्हटलं होतं. तर त्याला व्हिसा मिळेपर्यंत आबूधाबी सोडू नये अशी भूमिका काही खेळाडूंनी घेतली होती. (Shoaib Bashir Gets Visa)

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कार्यालयानेही भारताने परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यात सहकार्य करावं आणि अडवणुकीची भूमिका घेऊ नये, असं आवाहन केलं होतं. बशिर लंडनला परत गेल्यावर तिथल्या भारतीय दूतावासात संपर्क करायला त्याला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला व्हिसा मिळाला आहे. आता तो शनिवारी लंडनहून भारतात येणार असून ३ फेब्रुवारीला विशाखापट्टणम इथं होणाऱ्या कसोटीपूर्वी तो संघात सामील होईल. (Shoaib Bashir Gets Visa)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.