PM Narendra Modi : ‘राष्ट्र प्रतिष्ठे’ला प्राधान्य देऊन तिला नव्या उंचीवर घेऊन जा

ज्यांनी आपले जीवन राम काज आणि राष्ट्र काज (रामाचे कार्य आणि राष्ट्रकार्य) या दोन्हीसाठी समर्पित केले, त्या कल्याण सिंह यांसारखा सुपुत्र या प्रदेशाने देशाला दिला आहे. अयोध्या धाममध्ये कल्याण सिंह आणि त्यांच्यासारख्या लोकांचे स्वप्न देशाने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

195
PM Narendra Modi : 'राष्ट्र प्रतिष्ठे'ला प्राधान्य देऊन तिला नव्या उंचीवर घेऊन जा
PM Narendra Modi : 'राष्ट्र प्रतिष्ठे'ला प्राधान्य देऊन तिला नव्या उंचीवर घेऊन जा

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला. आता यापुढे ‘राष्ट्र प्रतिष्ठे’ला प्राधान्य देऊन तिला नव्या उंचीवर घेऊन जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी (२५ जानेवारी) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे १९,१०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. (PM Narendra Modi)

सशक्त राष्ट्र आणि सामाजिक न्यायासाठी आणखी गती वाढवावी लागेल!

ज्यांनी आपले जीवन राम काज आणि राष्ट्र काज (रामाचे कार्य आणि राष्ट्रकार्य) या दोन्हीसाठी समर्पित केले, त्या कल्याण सिंह यांसारखा सुपुत्र या प्रदेशाने देशाला दिला आहे. अयोध्या धाममध्ये कल्याण सिंह आणि त्यांच्यासारख्या लोकांचे स्वप्न देशाने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) आनंद व्यक्त केला. सशक्त राष्ट्र आणि खर्या सामाजिक न्यायाचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला आणखी गती वाढवावी लागेल. आपण देव ते देश आणि राम ते राष्ट्र या मार्गाला बळ दिले पाहिजे, असे २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचा सरकारचा संकल्प अधोरेखित करताना सांगितले. उच्च उद्दिष्टे साध्य करण्याबाबत बोलताना पंतप्रधानांनी सबका प्रयासच्या भावनेने आवश्यक असलेली सर्व संसाधने एकत्रित करण्यावर भर दिला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी उत्तर प्रदेशचा जलदगतीने विकास आवश्यक आहे, असे सांगत कृषी, विज्ञान, शिक्षण, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रांना नवी ऊर्जा देण्याची गरज आहे. आजचा कार्यक्रम या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi)

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी, बुलंदशहरच्या लोकांनी, विशेषत: मोठ्या संख्येने आलेल्या माता आणि भगिनींनी दाखवलेल्या आपुलकी आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामाच्या दर्शनाचे आणि आजच्या प्रसंगी उत्तर प्रदेशातील लोकांची उपस्थिती हे आपल्यासाठी भाग्य असल्याचे सांगत मोदी (PM Narendra Modi) यांनी याबद्दल आभार व्यक्त केले. रेल्वे, महामार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, पाणी, सांडपाणी, वैद्यकीय महाविद्यालय आणि औद्योगिक नागरी या क्षेत्रांमध्ये आजच्या १९,००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी बुलंदशहर आणि संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले. यमुना आणि राम गंगा नद्यांच्या स्वच्छता मोहिमेशी संबंधित प्रकल्पांच्या उद्घाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Maldives : ‘तो देश आपला जुना मित्र’ मालदिवच्या विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना फटकारलं)

पूर्वी सत्तेसाठी सामाजिक विभाजनामुळे राज्य आणि देशाला मोठी किंमत मोजावी लागली!

स्वातंत्र्योत्तर भारतातील विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश हे दुर्लक्षित राज्य होते. पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) ‘शासक’ मानसिकतेवर टीका केली आणि पूर्वीच्या काळी सत्तेसाठी सामाजिक विभाजन केल्यामुळे राज्य आणि देशाला मोठी किंमत मोजावी लागली. “देशाचे सर्वात मोठे राज्य जर कमकुवत असेल तर राष्ट्र कसे बलवान झाले असते?” असा प्रश्न पंतप्रधानांनी केला. (PM Narendra Modi)

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये दुहेरी इंजिन सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्याने जुन्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन मार्ग शोधले आणि आर्थिक विकासाला चालना दिली. आजचा प्रसंग सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला आहे असे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) अधोरेखित केले. पश्चिम उत्तर प्रदेशातील अलीकडच्या काळातील घडामोडींची उदाहरणे देताना पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) भारतातील दोन संरक्षण कॉरिडॉरपैकी एकाचा विकास आणि अनेक नवीन राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामांचा उल्लेख केला. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.