धर्म आणि वंशाच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिसांनी शिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेच्या गुरपतवंत सिंग पन्नूविरुद्ध (Gurpatwant Singh Pannu) गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पन्नूला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. यासोबतच सिख फॉर जस्टिसवर बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंह पन्नू याने दावा केला होता की, अमृतसरच्या श्री दुर्गियाना मंदिराला हिंदू धर्मात ऐतिहासिक महत्त्व नाही. खलिस्तान समर्थक नेत्याने मंदिर व्यवस्थापनाला त्याचे दरवाजे बंद करून सुवर्ण मंदिर प्रशासनाकडे चाव्या सोपवण्याचा इशाराही दिला होता. पंजाब पोलिसांनी सांगितले की, पन्नूच्या सोशल मीडिया व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu)याने 16 जानेवारी रोजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पोलिस प्रमुख गौरव यादव यांनाही धमकी दिली होती.
Join Our WhatsApp Community