75 th Republic Day : गणतंत्र ते हिंदूतंत्र

हिंदू हा शब्द उच्चारायला पूर्वी लोकांना लाज वाटायची. आज लोक स्वतःला हिंदूच काय तर संघी म्हणवून घेत आहेत. हा हिंदूंबाबतचा दृष्टीकोन बदलण्यात मोदींचा मोठा वाटा आहे.

244
75 th Republic Day : गणतंत्र ते हिंदूतंत्र
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

यंदा भारत ७५ वा गणतंत्र दिवस साजरा करत आहे. आजचा भारत पाहिला, तर कुणी कल्पनाही करू शकणार नाही की भारत गुलामगिरीत होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देश प्रगती करू शकणार नाही, असं काही प्रगत देशांचं मत होतं; मात्र भारताने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तत्कालीन राज्यकर्त्यांनी मतांसाठी हिंदूंना दाबून ठेवलं नसतं किंवा धर्माधर्मांमध्ये भांडणं लावली नसती, तर ही प्रगती लवकरच झाली असती. असो. ‘देर आए दुरुस्त आए’ असं म्हणत आता पुढचा प्रवास करायचा आहे.(75 th Republic Day )
२०२४ ला निवडणुका लागणार आहेत. नरेंद्र मोदी यांची सध्या दुसरी टर्म आहे. मोदींची कारकीर्द निश्चितच यशस्वी ठरली आहे. मरगळलेल्या वृत्तीमध्ये त्यांनी प्राण ओतले आहे. आज हिंदुहिताच्या राजकारणामध्ये मोदींचा सिंहाचा वाटा आहे. शिवाजी महाराज आणि सावरकरांनी निर्माण केलेल्या मंदिरावर मोदींनी कळस बसवला आहे.(75 th Republic Day )

१९३७ साली सावरकरांनी मतदारांना आवाहन केले होते की, त्यांनी हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांनाच मते द्यावी. सावरकर काय बोलत होते, हे ८० वर्षे उलटल्यानंतर मतदाराला कळले. हिंदू राज्यामध्ये सर्व धर्मांतील लोक सुरक्षित असतील, त्यांनादेखील न्याय मिळेल, ही सावरकरांची धारणा होती. आज घोषित नसले, तरी भारत हे हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्रात सगळे गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. डिसेंबर २०१४ ला ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये “Savarkar, Modi’s mentor. The man who thought Gandhi a sissy” या मथळ्याचा लेख प्रकाशित झाला होता. या सबंध लेखाचा अर्थ असा की, सावरकर हे अराजकवादी होते, ते मोदींचे गुरु असल्याने मोदीसुद्धा अराजक माजवतील. मात्र सावरकरांच्या लोकशाही मार्गावरून चालणा-या मोदींनी आपल्या कृतीनेच विरोधकांना सणसणीत चपराक लगावली.

(हेही वाचा : PM Narendra Modi : ‘राष्ट्र प्रतिष्ठे’ला प्राधान्य देऊन तिला नव्या उंचीवर घेऊन जा)

मोदी आले, तेव्हा ‘देश खड्ड्यात जाईल, हिंदू-मुस्लिम वैर होईल’, अशी भीती दाखवण्यात आली. पण हे काही उद्धवाचे अजब सरकार नाही. इथे पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा नाही, तर मणिहार घातला जातो, हे मोदींनी दाखवून दिले. हिंदू हा शब्द उच्चारायला पूर्वी लोकांना लाज वाटायची. आज लोक स्वतःला हिंदूच काय तर संघी म्हणवून घेत आहेत. हा हिंदूंबाबतचा दृष्टीकोन बदलण्यात मोदींचा मोठा वाटा आहे. सत्ता ही सर्व बाजूने यायला हवी. मोदींनी राजकीय सत्ता मिळवली, संघाने सामाजिक बाजू व्यापून ठेवली आहे. आता पुढचा प्रवास आणखी खडतर आहे; कारण कलात्मक आणि बुद्धीवाद्यांच्या जगतातदेखील सत्ता स्थापन करावी लागणार आहे. त्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे.

१९५० रोजी भारताला संविधान लाभले; कारण भारतात हिंदू बहुसंख्य होते. हिंदू अल्पसंख्य असते, तर भारताचा पाकिस्तान झाला असता. आज २०२४ उजाडले आहे. आपण ७५वा गणतंत्र दिवस साजरा करत आहोत. संविधान हिंदुत्वनिष्ठ्यांच्या हातात सुरक्षित आहे. उलट त्यामुळेच संवैधानिक मूल्ये जोपासली जात आहेत. आपला प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.