कन्नड साहित्यातलं आदराने घेतलं जाणारं एक नाव म्हणजे के. एस. नरसिंहस्वामी. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील महान योगदानासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार आणि आशियाई पुरस्कार प्राप्तकर्ते मिळाले आहेत. नरसिंहस्वामी यांचा जन्म मांड्या जिल्ह्यातील किक्केरी येथे २३ जानेवारी १९१५ रोजी झाला. (K. S. Narasimhaswamy)
त्यांनी कविता, अनुवादित साहित्य अशा साहित्यप्रकाराला हात घातला आहे. लहानपणापासूनच त्यांना अभियंता व्हायचे होते. मात्र त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी शिक्षण सोडले. पुढे ते म्हैसूरमधील नगरपालिकेच्या कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीवर रुजू झाले. मात्र त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. १९३४ मध्ये ते बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये दाखल झाले आणि त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. (K. S. Narasimhaswamy )
नरसिंहस्वामी प्रेमकविता लिहायचे. प्रेमकविता लिहिताना त्यांची लेखणी अगदी मोरपिसासारखी फिरायची. त्यांनी रॉबर्ट बर्न्स यांचे साहित्य देखील अनुवादित केले आहे. बर्न्स यांना ते आदर्श मानायचे. स्वामी यांचे महत्वाचे योगदान म्हणजे त्यांच्या काळी कन्नड कविता निसर्ग आणि नैसर्गिक जगात रमत होत्या. अशा वेळी त्यांनी लिहिलेल्या प्रेमकविता रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागल्या. त्यांनी त्याकाळात कन्नडमध्ये प्रेमकवितांचे युग आणले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
(हेही वाचा : Republic Day 2024 : २६ जानेवारीला ३५० किल्ल्यांवर फडकणार तिरंगा आणि भगवा ध्वज)
कला शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर १९५४ मध्ये ते बंगळुरू येथे आले. पुढे १९७० मध्ये ते कर्नाटक गृहनिर्माण मंडळात अधीक्षक म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना त्यांनी साहित्याशी आपले नाते कधी तोडले नाही. असे म्हटले जाते की त्यांच्या प्रेमकविता ह्या त्यांच्या पत्नीसाठीच लिहिलेल्या होत्या. त्यांच्या पत्नी ह्याच खर्या प्रेरणास्रोत होत्या. 1936 मध्ये त्यांनी तिप्तूर येथे वेंकम्मा यांच्याशी विवाह झाला होता. साहित्यवनात मनसोक्त हिंडून वयाच्या ८८ व्या वर्षी २७ डिसेंबर २००३ रोजी त्यांचे निधन झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community