Gyanvapi Mosque Varanasi Court : ज्ञानवापी मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे; काय आहे सर्वेक्षण अहवाल? 

630
Gyanvapi Mosque Varanasi Court : ज्ञानवापी मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे; काय आहे सर्वेक्षण अहवाल? 
Gyanvapi Mosque Varanasi Court : ज्ञानवापी मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे; काय आहे सर्वेक्षण अहवाल? 

वाराणसीतील ज्ञानवापी (Gyanvapi Case) संकुलाचा ASI सर्वेक्षण अहवाल गुरुवारी रात्री सार्वजनिक करण्यात आला. 839 पानांचा अहवाल हिंदू-मुस्लिम बाजूने सादर करण्यात आला आहे. यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी पत्रकार परिषद घेतली. अहवालात मंदिराचे 32 पुरावे सापडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भिंतींवर कन्नड, तेलगू, देवनागरी आणि ग्रंथा भाषेतील लिखाण सापडले आहे. (Gyanvapi Mosque Varanasi Court)

भगवान शिवाची 3 नावेही सापडली आहेत. जनार्दन, रुद्र आणि ओमेश्वर. मशिदीचे सर्व खांब पहिल्या मंदिरातील होते, जे सुधारित करून मशिदीत वापरले गेले. मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवरून ती मंदिराची भिंत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ही भिंत 5 हजार वर्षांपूर्वी नागारा शैलीत बांधण्यात आली होती. भिंतीखाली 1 हजार वर्षे जुने अवशेषही सापडले आहेत. मात्र, अहवाल वाचल्यानंतरच काही सांगता येईल, असे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे.

(हेही वाचा Republic Day : ‘श्रीराम मंदिर जनतेच्या श्रद्धेची अभिव्यक्ती म्हणून नव्हे, तर लोकांच्या न्यायप्रक्रियेवरच्या प्रचंड विश्वासाचं द्योतक’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)

‘हनुमान, गणेशांच्या मोडकळीस आलेल्या मूर्ती सापडल्या’

विष्णू शंकर जैन म्हणाले, “मशिदीचा घुमट केवळ 350 वर्षे जुना आहे. हनुमान आणि गणेशाच्या खंडित मूर्तीही सापडल्या आहेत. भिंतीवर त्रिशूलाचा आकार आहे. मशिदीत (Gyanvapi Case)औरंगजेब काळातील एक दगडी स्लॅबही सापडला आहे. तळघर S2 मध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीही सापडल्या आहेत. एएसआयने 2 सप्टेंबर 1669 रोजी मंदिर पाडल्याच्या जदुनाथ सरकारच्या निष्कर्षावर विश्वास व्यक्त केला आहे. वाराणसी न्यायालयाने 24 जानेवारी रोजी दोन्ही पक्षांना सर्वेक्षण अहवालाच्या हार्ड कॉपी देण्याबाबत निर्णय दिला. यानंतर, गुरुवारी, 24 जानेवारीला सकाळी सीलबंद अहवाल वाराणसी न्यायालयाच्या टेबलावर ठेवण्यात आला. तो लिफाफा न्यायाधीशांसमोर उघडण्यात आला. यानंतर अहवालातील पानांची मोजणी करण्यात आली. ज्यासाठी न्यायालयाने प्रति पान दोन रुपये दर निश्चित केला. (Gyanvapi Mosque Varanasi Court)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.