शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने “महासंस्कृती” महोत्सव दि. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यात “महासंस्कृती” महोत्सवाचे आयोजन ह.भ.प संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कलजवळ, डोंबिवली (पूर्व), (Dombivli East) ता. कल्याण, जि. ठाणे येथे दि.26 जानेवारी ते 30 जानेवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – K. S. Narasimhaswamy : कन्नड साहित्यिक के. एस. नरसिंहस्वामी)
या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेचे विविध प्रकार, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, जिल्ह्यातील स्थानिक सण-उत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सचित्र दालन, वस्त्र संस्कृती, हस्तकला, पर्यटनविषयक दालन इत्यादी कार्यक्रमांची /उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
तरी या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community