२६ जानेवारी! भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातही (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) ध्वजवंदन करण्यात आले. (Republic Day) स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, स्मारकाचे सदस्य के. सरस्वती, कमलाकर गुरव तसेच तुषार देसाई आणि श्रीपाद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – Padma Award Maharashtra : यंदा महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव)
अनेक वर्षांच्या अन्यायाचे राममंदिराच्या रूपाने परिमार्जन – मंजिरी मराठे
अनेक वर्षांच्या अन्यायाचे परिमार्जन राममंदिर (Ayodhya Rammandir) बांधून झालेले आहे. सगळा हिंदू समाज एकवटला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०९ मध्ये म्हटले होते, प्रभु रामचंद्र वनवासात गेले; कारण त्यांना राक्षसांचा वध करायचा होता. रावणाच्या वधासाठी अपरिहार्य असे ते युद्ध होते. प्रभु रामचंद्र पित्याच्या इच्छेसाठी वनात गेले, ते अवतारकृत्य महद् होते, त्यांनी रावणाचा वध केला ते त्यांचे महत्तर कार्य होते. लोकनायकाच्या, राजाच्या भूमिकेसाठी त्यांनी व्यक्तीगत कर्तव्य बाजूला ठेवले. तो श्रीरामाचा गुण आज आपण शिकण्यासारखा आहे. आपण सगळे संघटित होणे गरजेचे आहे, असे आवाहन मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी या वेळी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community