Naxal commander Santosh Shelar : संतोष शेलार एटीएसच्या ताब्यात : कबीर कला मंचचे नक्षली नेटवर्क पुन्हा उघड

Naxal commander Santosh Shelar : संतोष शरण आल्यास त्याला माफीचा साक्षीदारही केले जाण्याची शक्यता आहे. चौकशीत असहकार्य केल्यास अटकही होऊ शकते.

247
Naxal commander Santosh Shelar : संतोष शेलार एटीएसच्या ताब्यात : कबीर कला मंचचे नक्षली नेटवर्क पुन्हा उघड
Naxal commander Santosh Shelar : संतोष शेलार एटीएसच्या ताब्यात : कबीर कला मंचचे नक्षली नेटवर्क पुन्हा उघड

कबीर कला मंच या शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या संघटनेच्या संपर्कातून नक्षली चळवळीत सक्रीय झालेला संतोष शेलार याला पुणे एटीएसने ताब्यात घेतले आहे. संतोष शेलार (Santosh Shelar) सध्या तांडा दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत आहे. विश्वा उर्फ संतोष उर्फ पेंटर वसंतराव शेलार आजारी असतांना घरी आल्यावर घरच्यांनीच पोलिसांनी माहिती दिली. (Naxal commander Santosh Shelar)

(हेही वाचा – Republic Day : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ध्वजवंदन)

चौकशीत असहकार्य केल्यास अटक

या प्रकरणामुळे कबीर कला मंचचे (Kabir Kala Manch) नक्षली नेटवर्क पुन्हा एकदा उघड झाले आहे. संतोष शेलारची सध्या चौकशी सुरू आहे. त्याचे समुपदेशनही केले जाऊ शकते. त्यात संतोष शरण आल्यास त्याला माफीचा साक्षीदारही केले जाण्याची शक्यता आहे. चौकशीत असहकार्य केल्यास अटकही होऊ शकते.

कबीर कला मंचच्या संपर्कात येऊन शहरी झोपडपट्टीतील अनेक युवक नक्षलवादाकडे वळत असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमध्ये उघडकीस आले आहे. प्रशांत जालींदर कांबळे उर्फ लॅपटॉप आणि मूळचा नागपूरचा असलेला सुनील दुधे हेही अशाच प्रकारे नक्षलवादी चळवळीच्या संपर्कात आला आहे. सुनील दुधे चार वर्षांपासून गायब असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

(हेही वाचा – Mumbai Grant Road Fire : मुंबईत ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू)

कबीर कला मंचच्या नक्षली कारवाया

वरवर विद्रोही कविता सादर करणे आणि झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यावर नाटक करणे असे कार्य दाखवणारी कबिर कला मंच प्रत्यक्षात दहशतवादी कारवाया करणाऱ्या प्रतिबंधित सीपीआयएमची (CPIM) फ्रंटल संघटना असल्याचे एनआयएच्या कारवाईत उघड झाले होते. पुण्यात कबीर कला मंचने सादर केलेल्या विद्रोही शाहिरी जलशामुळे प्रभावित होऊन संतोष शेलार नक्षली चळवळीच्या संपर्कात आला होता. २०१० मध्ये तो गायब झाला. पुढे तो छत्तीसगडच्या जंगलात बंदी घातलेल्या तांडा दलम या सशस्त्र माओवादी संघटनेचा कमांडर म्हणून सक्रीय झाला. (Naxal commander Santosh Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.