- ऋजुता लुकतुके
भारतात ५जी सेवेचा विस्तार करण्यासाठी या सेवेत नवीन संशोधनासाठी रिलायन्स जिओ आणि वन प्लस ही जागतिक मोबाईल कंपनी एकत्र आले आहेत. ५जी तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना नवीन काय सेवा देता येतील यावर दोन्ही कंपन्या एकत्र काम करणार आहेत. आणि त्यासाठी अगदी आधुनिक आणि अद्ययावत अशी प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहे. (Jio-OnePlus Partnership)
या प्रयोगशाळेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास यावर काम होणार आहे. तसंच नवीन प्रणाली वापरण्यायोग्य आहे की नाही, लोकांची त्यावर मतं काय आहेत, याचा आढावा घेण्यासाठीही विशेष यंत्रणा इथं राबवण्यात येणार आहे. भारतातील ग्राहकांना ५जी ची अखंड आणि आधुनिक सेवा मिळावी यासाठी हा प्रयत्न होणार आहे. (Jio-OnePlus Partnership)
(हेही वाचा – Ramesh Bais : आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना)
५जीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी तयार
‘जिओ बरोबरच्या या करारामुळे वन प्लस कंपनीला भारतात ५जी सेवा एका नवीन पातळीवर घेऊन जाण्याचं उद्दिष्ट सर करता येणार आहे. आम्ही ५जीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी तयार आहोत. ग्राहकांना उत्तम सेवा देणं आणि त्यांचा फोन वापरण्याचा अनुभव एकदम बदलून टाकणं हे आमचं ध्येय आहे,’ असं वन प्लस कंपनीचे प्रवक्ते मीडियाशी बोलताना म्हणाले. (Jio-OnePlus Partnership)
‘देशातील ८५ टक्के ५ जी नेटवर्क हे रिलायन्सने उभारलं आहे. आता त्याचा वापर करून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणं हे आमचं लक्ष्य आहे. त्यासाठी वन प्लस बरोबरचा हा करार महत्त्वाचा आहे,’ असं रिलायन्स जिओच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. वन प्लस हा मोबाईलमधील एक प्रिमिअम ब्रँड आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त फोन बनवण्यासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. (Jio-OnePlus Partnership)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community