मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषण करण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा वाशी रोखला गेला. वाशीच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत मात्र, हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने येण्याचा निर्णय शनिवारी दुपारी बारा वाजता घेतला जाईल, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत तरी मुंबई महापालिकेला दिलासा मिळाला आहे. मात्र, हा निर्णय जरांगे पाटील यांना समाजावर सोपवला आहे. त्यामुळे अध्यादेश निघाल्यानंतरही जर जल्लोष आझाद मैदानात करण्यावर जरांगे पाटील आणि समाजाची लोक ठाम राहिल्यास महापालिकेला याठिकाणी येणाऱ्या जमावाच्या दृष्टीकोनातून प्रसाधनगृह आणि पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे ही प्राथमिक सर्व तयारी महापालिकेने तयार करून ठेवली आहे. (Maratha Reservation)
विजयी गुलाल घेऊन मुंबईत जाणारच
मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत वाटल्यास आजची रात्र इथेच थांबतो. २६ जानेवारीचा मान ठेवून मुंबईला जात नाही. वाशीतच थांबतो. मात्र, अध्यादेश मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या म्हणजे शनिवारी बारा वाजता घेणार आहे. अध्यादेश मिळाला की विजयी गुलाल घेऊन मुंबईत जाणारच. सग्यासोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आजच द्यावा असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वाशीतील शिवाजी चौकातील सभेत सांगितले. (Maratha Reservation)
आझाद मैदानात घेण्याचा निर्णय घेतल्यास
अध्यादेश निघाला तरीही जल्लोष करण्यासाठी जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबई आझाद मैदानात दाखल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आझाद मैदानाची क्षमता ही पाच हजार लोकांचीच असल्याने आझाद मैदान पोलिसांनी सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना २४ जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून आपल्या आंदोलनासाठी मुंबईत जागा नसल्याचे कळवले होते. त्यामुळे नवी मुंबई खारघर सेक्टर २९मधील सेंट्रल पार्क जवळील इंटरनॅशनल कार्पोरेशन पार्क मैदानात घेण्याबाबत कळवले. परंतु प्रजासत्ताक दिनी मुंबईत येणारा हा मोर्चा आता शनिवारी २७ जानेवारी रोजी काढण्याचा निर्णय घेतला जाणार असून हा मोर्चा तथा सभा आझाद मैदानात घेण्याचा निर्णय घेतल्यास महापालिकेला प्रसाधनगृहे आणि पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – When Neeraj Met Federer : फेडररला भेटल्यावर नीरज चोप्राची स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया)
सुमारे ९०० ते १ हजार शौचकुपे उपलब्ध
आतापर्यंत पोलिस तसेच महापालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी न दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने कोणतीही व्यवस्था केली नव्हती. परंतु या मैदानात जर मोठी सभा झाल्यास महापालिका ए विभागाच्या सहायक आयुक्तांनी सुमारे ९०० ते १ हजार शौचकुपे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. तेवढी शौचकुपे उपलब्ध करून ठेवण्याची तयारी केलेली असून ही शौचकुपे उपलब्ध करून दिली जातात. तसेच जलअभियंता यांच्या ताब्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकरही याठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे सर्वसाधारणपणे मराठा बांधवांच्या या मोर्चासाठी प्रसाधनगृहे आणि पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जातील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Maratha Reservation)
रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकेही सज्ज
याठिकाणी मोठ्याप्रमाणात मोर्चा आल्यास रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नर्सेस व इतर वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त जयपाल मोरे यांच्या देखरेखीखाली वॉर्डाचे वैद्यकीय अधिकारी यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाबरोबरच जे जे आणि कामा रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांची टिम तैनात करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रुग्णवाहिका आणि डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदींचा ताफाही सज्ज ठेवण्यात आला आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community