Preamble of indian Constitution : प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाची तत्वे

246

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली (Preamble of indian Constitution) आणि भारत प्रजासत्ताक (Republic Day) झाला, देशात लोकशाही लागू झाली. भारतीय संविधानाची गणना जगातील सर्वात महान संविधानांमध्ये केली जाते. हे संविधान केवळ नियमांचे किंवा कायद्यांचे पुस्तक नाही तर भारतीय मूल्यांची गाथा आहे. आपण भारतीय धार्मिक भेदभावाच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतो.

२६ जानेवारीला संविधान का लागू झाले?

कोणत्याही गोष्टीला जसे कारण असते, तसेच २६ जानेवारीचे देखील महत्व आहे. २६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्याची घोषणा केली. ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला Dominion Status द्यावा. पूर्ण स्वराज्याची घोषणा २६ जानेवारीला केल्यामुळे हा प्रजासत्ताक दिन Republic Day म्हणून निवडला गेला.

संविधान निर्माण करायला किती दिवस लागले?

१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेची घोषणा केली गेली आणि ९ डिसेंबर १९४८ मध्ये काम सूरू झाले. जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस इतक्या दीर्घ कालावधीनंतर संविधान तयार करण्यात आणि भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त केले…

(हेही वाचा Republic Day : सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार – राज्यपाल)

मसुदा कोणी तयार केला?

ज्यांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो अशा महामानवाने म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. याच कारणासाठी आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. त्यांनी त्यामध्ये अनेक सुधारणा आणि बदल केले. पुढे समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी केली. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी संविधान देशात लागू झाले. (Preamble of indian Constitution)

कसा साजरा केला जातो हा लोकशाहीचा सोहळा?

संपूर्ण देशामध्ये शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांपासून अगदी सोसायटी, चाळीत देखील हा सोहळा उत्साहात पार पाडला जातो. देशभक्त नागरिक तिरंगा फडकवतात. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर भव्य पथसंचलन होते. या पथसंचलनामध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल अशा विविध रेजिमेंट्स भाग घेत आहेत.

भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देण्याबाबत चर्चा होत होती. देशातील नेत्यांनी मूलभूत हक्कांचा पुरस्कार केला आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. या मूलभूत अधिकारांना संविधानाचा आत्मा देखील म्हटले जाते. भारतीय महापुरुषांचे महान विचार आणि कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा डोळ्यांसमोर ठेवून संविधानात मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि न्यायव्यवस्था यांचा उल्लेख आहे.

नियम आणि कायदे:

संविधानानुसार सरकार कोणतेही नियम बनवू शकते. पण सरकारवर अंकुश ठेवण्याचे कामही राज्यघटनाच करते. राज्यघटनेने देशातील नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिले आहेत. प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे विचार आणि कल्पना असतात. या विचारांच्या प्रभावाने तो निर्णय घेतो. देशात कोणाचे नियम लागू करायचे हे संविधानानुसार ठरवले जाते. भारतात संविधानानुसार, केवळ संसदेने आणि विधानसभेने कार्यपद्धतीचे अनुसरण करून केलेले कायदे आणि नियम देशात लागू आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.