BMC : मुंबई महापालिकेत ध्वजारोहण करणाऱ्या आश्विनी भिडे दुसऱ्या महिला अधिकारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी महिला सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागली जावी अशाप्रकारची इच्छा सर्वच ठिकाणांहून व्यक्त केली जात असतानाच महापालिका मुख्यालयात शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण प्रभारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले.

9621
BMC : मुंबई महापालिकेत ध्वजारोहण करणाऱ्या आश्विनी भिडे दुसऱ्या महिला अधिकारी
BMC : मुंबई महापालिकेत ध्वजारोहण करणाऱ्या आश्विनी भिडे दुसऱ्या महिला अधिकारी
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिका आयुक्तपदी महिला सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागली जावी अशाप्रकारची इच्छा सर्वच ठिकाणांहून व्यक्त केली जात असतानाच महापालिका मुख्यालयात शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण प्रभारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले. आतापर्यंत प्रभारी आयुक्त म्हणून ध्वजारोहण करणाऱ्या आश्विनी भिडे यांनी दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त असून यापूर्वी अशाप्रकारचा मान तत्कालिन महापालिका आयुक्त शरद काळे यांच्या अनुपस्थितीमध्ये अतिरिक्त आयुक्त सुधा भावे यांना मिळाला होता, त्यामुळे महापालिकेला महिला आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांच्या रुपात लाभावा अशी मुंबईतील जनतेची तीव्र इच्छा असतानाच त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण झाल्याने मुंबईकरांना याचा अधिक आनंद होत आहे. (BMC)

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) आश्विनी भिडे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २६ जानेवारी २०२४ सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल हे सुट्टीवर गेल्याने महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्याकडे या पदाचा प्रभारी भार सोपवण्यात आला आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत चहल हे सुट्टीवर असल्याने आश्विनी भिडे या प्रभारी आयुक्त तथा प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळत आहे. यापूर्वी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुधा भावे, मनिषा म्हैसकर, आय. ए. कुंदन या महिला अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या गैरहजेरीत प्रभारी आयुक्त पदाचा भार सांभाळण्याची संधी प्राप्त झाली होती. मात्र, यातील सुधा भावे यांच्या हस्तेच यापूर्वी प्रभारी आयुक्त म्हणून महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण पार पडले होते. त्यानंतर ही संधी तथा मान प्रभारी आयुक्त तथा प्रशासक आश्विनी भिडे यांना प्राप्त झाला आहे. (BMC)

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव तसेच सह आयुक्त (विशेष) रमेश पवार, सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौंडण्यपुरे, महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, विविध खात्यांचे प्रमुख, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Maratha Reservation : आझाद मैदानात मोर्चा आल्यास महापालिकेची अशी असेल तयारी)

आश्विनी भिडे यांच महापालिकेला वळण लावू शकतात 

मुंबई महापालिका अस्तित्वात येवून दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळ उलटलेला असून या महापालिकेचे आयुक्तपद निर्माण होऊन १५८ वर्षे झाली तरी एकाही महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती झालेली नाही. तसेच महापालिकेत मागील ६१ वर्षांपासून सनदी अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती केली जाते, पण आजवर एकाही महिला सनदी अधिकाऱ्याची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील दीडशे वर्षांपासून एकाही महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी नेमणूक न झाल्याने राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार हे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी महिला अधिकाऱ्याची नेमणूक करतील का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या महापालिका मुख्यालयात प्रभारी आयुक्त तथा प्रशासक आश्विनी भिडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने हा क्षण सर्वांनासाठीच आनंदाचा ठरला होता. महापालिका आयुक्तपदी कोणत्याही महिला अधिकाऱ्याची वर्णी लागेल याची कल्पना नाही. (BMC)

परंतु अमृत महोत्सवी वर्षांतील प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई महापालिकेत प्रभारी प्रशासक म्हणून महिला अधिकाऱ्याला मान मिळाल्याने तसेच त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह आनंदाचा वातावरण पसरले आहे. महापालिकेतील सध्याच्या बेशिस्त कारभाराला आश्विनी भिडे यांच वळण लावू शकतात. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी सरकारने भिडे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करून पर्यायाने महापालिकेला तारुण नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतानाच पहिल्या महिला अधिकाऱ्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे स्वप्नही साकार करावे अशी भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. महापालिका यापूर्वी दोन वेळा दिवाळखोरीच्या वाटेवर असताना एकदा अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि दुसऱ्यांदा आयुक्त म्हणून सुबोध कुमार यांचे तारणहार बनले होते, त्यामुळे सध्या महापालिकेला अशाच सुबोधकुमारांची गरज असून कर्मचाऱ्यांच्या मते आश्विनी भिडेच महापालिकेला पुढे चांगल्याप्रकारची आर्थिक शिस्त लावू शकतात. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.