ज्ञानवापीचा ASI अहवाल आल्यानंतर हिंदू पक्षाचे वकील हरी शंकर जैन यांनी ते आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्या वास्तूच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते, असे अहवालात स्पष्टपणे लिहिलेले आहे, त्यामुळे सरकारने ज्ञानवापी (Gyanvapi) राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी वकील जैन यांनी केली.
मशिदीचे बांधकाम हिंदू मंदिराचे अवशेष वापरून केले
वकील हरी शंकर जैन म्हणाले, “अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, ज्ञानवापी (Gyanvapi) मशिदीच्या जागेवर एक मंदिर अस्तित्वात आहे. भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलून ते राष्ट्रीय स्मारक घोषित करावे आणि कायदा करून संपूर्ण परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा. एएसआयच्या अहवालातील मुख्य ओळी वाचून अधिवक्ता विष्णू जैन विचारतात की, एएसआयने दिलेल्या अहवालात स्पष्टपणे लिहिले आहे की मंदिर पाडल्यानंतर मशीद उभारण्यात आली होती आणि मंदिराचे अवशेष वापरून मशीद उभारण्यात आली. हिंदू धर्मानुसार, हे स्पष्ट आहे की, एकदा मंदिरासाठी जागा बनविली की ती नेहमीच मंदिराची जागा राहील आणि शेवटपर्यंत ती केवळ मंदिराचीच मालमत्ता असेल, असे अधिवक्ता विष्णू जैन म्हणाले.
(हेही वाचा Gyanvapi Mosque Varanasi Court : ज्ञानवापी मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे; काय आहे सर्वेक्षण अहवाल? )
राम मंदिराच्या वेळी, उत्खननानंतर, ते ठिकाण राम जन्मस्थान असल्याचे पुरावे सापडले होते, परंतु येथे रचना स्वतःच याची साक्ष देत आहे. एक हिंदू मंदिर. संरचनेच्या पश्चिमेकडील भिंतीवरील हिंदू चिन्हे देखील दर्शवतात की ती हिंदू मंदिराची भिंत आहे आणि त्या संरचनेचा भाग नाही. हे खांब हिंदू मंदिराचे खांब असल्याचेही सांगत आहेत. विष्णू जैन म्हणतात, “सर्व पुरावे आमच्या पक्षाला बळकटी देतात की, आमचे धार्मिक स्थळ, आमचे मंदिर अंजुमन अंजामिया मस्जिद समितीने ताब्यात घेतले आहे. आमच्या मंदिराचा मशीद म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे अधिवक्ता विष्णू जैन म्हणाले.
Join Our WhatsApp Community