जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक आणि विचारवंत Lewis Carroll

लुईस यांच्यामध्ये विविध गुण होते आणि त्या गुणांमध्ये ते तरबेज होते. ते एक इंग्रजी लेखक, गणितज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि छायाचित्रकार होते.

199

लुईस कॅरोल (Lewis Carroll) यांचे खरे नाव चार्ल्स लटविज डॉजसन असे होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी १८३२ रोजी इंग्लंड येथे झाला. “एलिस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड” आणि “थ्रू द लुकिंग ग्लास” या त्यांच्या साहित्यकृतीसाठी ते ओळखले जातात. डॉजसन यांनी द ट्रेन या मासिकात एक पॅरडी सादर केली. तेव्हा याचे संपादक एडमंड येट्स यांनी त्यांना ’लुईस कॅरोल’ हे नाव दिले. तेव्हापासून चार्ल्स लटविज डॉजसन हे लुईस कॅरोल (Lewis Carroll) या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.

लुईस यांच्यामध्ये विविध गुण होते आणि त्या गुणांमध्ये ते तरबेज होते. ते एक इंग्रजी लेखक, गणितज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि छायाचित्रकार होते. शब्दिक खेळ, तर्कशास्त्र आणि कल्पनारम्य या विशेष गुणांसाठी ते प्रसिद्ध होते. १८७१ साली आलेला”जॅबरवॉकी’ आणि १८७६ मध्ये आलेला ’द हंटिंग ऑफ द स्नार्क’ कवितासंग्रह म्हणजे विनोदी अंगाने कविता कशा लिहाव्यात याचे उत्तम उदाहरण आहे.

(हेही वाचा Gyanvapi ज्ञानवापी राष्ट्रीय स्मारक घोषित करून हिंदूंना द्या; ASI सर्वेक्षण अहवालानंतर काय म्हणाले याचिकाकर्त्यांचे वकील हरिशंकर जैन?)

डॉजसनचे कुटुंब प्रामुख्याने उत्तरेकडील इंग्रजी, जुन्या विचारांचे आणि हाय-चर्च अँग्लिकन होते. त्यांचे बहुतेक पुरुष पूर्वज सैन्य अधिकारी किंवा अँग्लिकन क्लर्जिमेन होते. त्याचे पणजोबा चार्ल्स डॉजसन हे आयर्लंडमधील एल्फिनचे बिशप होते. त्यामुळे त्यांचे पालनपोषण अतिशय धार्मिक वातावरणात झाले. लुईसने डॉब्लेट्स नावाचे एक लॅडर पझल तयार केले होते. हे कोडे वॅनिटी फेअर मॅगझिनमध्ये १८७९ आणि १८८१ दरम्यान प्रसिद्ध झाले.

लुईस (Lewis Carroll) यांचे कार्य खूप मोठे होते. १९८२ मध्ये वेस्टमिन्स्टर ॲबे येथील पोएट्स कॉर्नर येथे लुईस कॅरोल यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या कलाकृतींना अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांद्वारे त्यांच्या नावाच्या संस्था चालवल्या जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.