Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सन २०२३-२०२४ वर्षांसाठी धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा २६५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

258
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

भारताला विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपणा सर्वांचे सहकार्य आणि योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायती राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. (Girish Mahajan)

यावेळी पालकमंत्री महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. २०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला १०० पूर्ण होतील. त्यामुळे येत्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली आणि आत्मनिर्भर भारत घडवायाचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आपणा सर्वांची साथ आवश्यक आहे. (Girish Mahajan)

(हेही वाचा – Mumbai Grant Road Fire : चोर बाजारातील ‘ती’ आग गुरुवारी रात्री पर्यंत धुमसतच होती)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सन २०२३-२०२४ वर्षांसाठी धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा २६५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Girish Mahajan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.