Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे का वाढणार भाज्यांचे भाव? जाणून घ्या…

260

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे मोर्चा घेऊन येत असतानाच त्यांनी २६ जानेवारी रोजी वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्काम केला. त्यांचा मुक्काम २७ जानेवारीपर्यंत वाढणार आहे. त्याआधी २ दिवस बाजार बंद ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे सलग चार दिवस बाजारात भाज्यांची आवक झाली नाही. त्यामुळे मुंबई आणि महानगरात भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Maratha Reservation : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक)

आंदोलनामुळे  (Maratha Reservation) दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने सलग चार दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. सलग चार दिवस बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प राहणार आहेत. भाजीपाला, फळ आणि कांदा, बटाट्याचे भाव वाढणार का?, याची चिंता सतावू लागली आहे. माल मार्केटमध्ये न आणता थेट मनपा क्षेत्रात विकला जाणार दोन दिवसांपासून बंद असलेले मार्केट शनिवारी सुरू होणार या आशेमुळे शेतकऱ्यांनी नवी मुंबईच्या दिशेने माल पाठवला आहे. मार्केटमध्ये माल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. तसेच, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्या. यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन बाजार समितीमध्ये येणाऱ्या गाड्या या शनिवारी मार्केटमध्ये न आणता थेट मुंबई, ठाणे आणि इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात आणण्यासाठी तसेच त्या ठिकाणच्या मार्केटमध्ये सेवा परवण्यासाठी सरकारने मभा दिली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.