Israel-Hamas Conflict : मध्य गाझामध्ये हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या २६ हजारांच्या पुढे

७ ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझावर हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यासह प्रत्युत्तर दिले.

272
Israel-Hamas Conflict : मध्य गाझामध्ये हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या २६ हजारांच्या पुढे

मध्य गाझा पट्टीमधील (Israel-Hamas Conflict) नुसिरात शहरी निर्वासित छावणीवर इस्रायली हवाई हल्ल्यात पाच महिन्यांच्या बाळासह १५ जणांचा मृत्यू झाला. युद्ध सुरू झाल्यापासून मृतांची संख्या २६ हजारांहून अधिक झाली आहे, असे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार)

दक्षिण गाझामध्ये, इस्रायली सैन्याने (Israel-Hamas Conflict) खान युनूस शहरावर चढाई केली. इस्रायली सैन्याने शुक्रवारी (२६ जानेवारी) शेजारच्या तीन भागांना आणि खान युनूसच्या निर्वासित छावणीला रिकामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च न्यायालयाने गाझामध्ये त्वरित युद्धबंदीचे आदेश देण्यास नकार दिला, परंतु इस्रायलला आणखी जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक)

इस्रायलवर नरसंहार केल्याचा आरोप करण्यात आलेला खटला फेटाळता येणार नाही –

खटला दाखल करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने न्यायालयाला (Israel-Hamas Conflict) इस्रायलला आपली लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. गाझामध्ये इस्रायलवर नरसंहार केल्याचा आरोप करण्यात आलेला खटला फेटाळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नरसंहार आरोप फेटाळण्याची इस्रायलची याचिका देखील न्यायालयाने फेटाळली.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; मराठा बांधवांकडून जल्लोष)

२६,०८३ पॅलेस्टिनींचा मृत्यू –

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की युद्ध (Israel-Hamas Conflict) सुरू झाल्यापासून मृत झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या २६,०८३ वर पोहोचली आहे, तर ६४,४८७ पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. मंत्रालयाने मृतांच्या संख्येत लढवय्ये आणि नागरिक यांच्यात फरक केला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.