सर्वांना मोफत लस देण्याच्या मागणीसाठी भाजपचे महापौर दालनाबाहेर निदर्शने!

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण करणे गरजेचे आहे. गेले तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही, असे घोषित केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. 

148

सर्वांना मोफत लस देण्याच्या मागणीवरून मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली. मुंबईत मागील चार दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद असून नागरिकांना लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्र सुरू करा आणि सर्वांना मोफत लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत महापलिका मुख्यालय दणाणून सोडले.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण करणे गरजेचे आहे. गेले तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही, असे घोषित केले आहे. याआधीही आठवडाभर लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पुर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. यामध्ये वरीष्ठ नागरिकांना विशेषत: ८० वर्षांवरील अती वरिष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. या निदर्शनावेळी गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, उपनेते अभिजित सामंत, रिटा मकवाना, उज्वला मोडक, अतुल शाह, शितल गंभीर – देसाई, राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी, नेहल शाह, प्रकाश गंगाधरे, जगदीश ओझा, साक्षी दळवी, जागृती पाटील, महादेव शिवगण, हरिष भांदिर्गे अनिष मकवानी,पंकज यादव, जितेंद्र पटेल,आदी भाजपा नगरसेवक उपस्थित होते.

(हेही वाचा : आयपीएलला कोरोनाचे ग्रहण! उर्वरित सर्व सामने रद्द!)

New Project 2 2

या आहेत भाजपच्या मागण्या!

  • सर्व मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे.
  • ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याच्या सूचना द्याव्यात.
  • अती वरिष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी.
  • ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल, तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे.
  • १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणी नंतर आगाऊ निश्चित केलेल्या वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे.
  • मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पुरेसा लसीचा पुरवठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करावा.
  • सर्व लसीकरण केंद्रे किमान १२ तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे २४ तास लसीकरणासाठी उघडी ठेवावीत. सर्व लसीकरणाची प्रक्रिया आगाऊ निश्चित केलेल्या वेळेनुसारच करावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.