मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा लढा आज संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांच्याशी तीन तास चर्चा करून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसा नवीन जीआर सुध्या त्यांनी स्वतः नवी मुंबईला जाऊन जरांगे यांना दिला. याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला घेरणारे (Chhagan Bhujbal) मंत्री छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का?” असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी उद्या रविवार २८ जानेवारी रोजी एक बैठक बोलवली आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांच्या ‘या’ मागण्या सरकारने केल्या मान्य)
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ?
राज्य सरकारने सध्या काढलेला जीआर ही एक प्रकारची नोटीस आहे. त्यावर हरकती मागवण्यात येणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता ओबीसी (Chhagan Bhujbal) समाजातील वकिल व तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून द्याव्या. त्यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल. तसेच या प्रकरणाचा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही विचार करु. योग्य पद्धतीने कारवाई करु. सरकारने त्यानंतरही कायदा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा स्पष्ट इशारा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती)
असे कसे चालणार –
सरसकट गुन्हे मागे घ्या ही मागणी मान्य झाली. त्याबद्दल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला. उद्या कोणी घरे जाळली तरी गुन्हे मागे घ्या, असे कसे चालणार आहे, असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला विचारला. तसेच झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
EWS मधून आरक्षण मिळू नये…
हेही पहा –
Join Our WhatsApp Community