Mary Kom Not Retired : मेरी कोमने निवृत्तीची बातमी फेटाळली

मीडियाने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं मेरी कोमने म्हटलं आहे. आणि त्यामुळे गुरुवारी पसरलेली निवृत्तीची बातमी खोटी असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

198
Mary Kom : ऑलिम्पिक संघटना आपलं ऐकत नसल्याचा मेरी कोमचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

६ वेळा विश्वविजेती आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयुद्धात कांस्य पदक पटकावणाऱ्या मेरी कोमचा (Mary Kom) इतक्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून संन्यास घेण्याचा विचार नाही. मीडियामध्ये गुरुवारी याविषयी आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं तिने दिल्लीत आल्या आल्या स्पष्ट केलं आहे. (Mary Kom Not Retired)

निवृत्तीच्या बातमीचं खंडन करताना तिने काढलेल्या पत्रकात ती म्हणते, ‘मी जेव्हा निवृत्ती पत्करेन, तेव्हा स्वत: पत्रकारांसमोर येईन. एका कार्यक्रमात गुरुवारी मी जे बोलले, त्याचा चुकीचा अर्थ मीडियाने आता काढला आहे. मला इतक्यात निवृत्त व्हायचं नाही. उलट मी पूर्ण तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.’ (Mary Kom Not Retired)

मेरी कोम गुरुवारी एका खाजगी शाळेतील कार्यक्रमासाठी आसाममध्ये दिब्रुगढला गेली होती. तिथे मुलांसमोर बोलताना तिने मला अजून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायच्या आहेत. पण, ऑलिम्पिकसाठी ४० वर्षांची अट घातल्यामुळे तिथे खेळणं अशक्य झालं आहे, असं विधान केलं होतं. (Mary Kom Not Retired)

(हेही वाचा – Fastest Triple Century in FC : तन्मय अगरवालचं प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक साजरं)

माझ्यात खेळण्याची भूक अजूनही बाकी – मेरी कोम

यावर मेरी कोम (Mary Kom) आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून निवृत्त होत असल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रांनी दिली. आणि नंतर ती बातमी सगळीकडे पसरली. पण, आता मेरी कोमने (Mary Kom) आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ती अजूनही खेळत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘तसं या खेळात मी सगळं काही मिळवलं आहे. पण, माझ्यात खेळण्याची भूक अजूनही बाकी आहे. आणि मी सध्या तंदुरुस्तीवरच मेहनत घेत आहे,’ असं ती म्हणाली. (Mary Kom Not Retired)

४१ वर्षीय मेरी कोमकडे (Mary Kom) ८ विश्वविजेतेपद स्पर्धेतील पदकं आहेत. यातील ६ सुवर्ण पदकं आहेत. पुरुष किंवा महिला मुष्टियोध्याला मिळालेली या स्पर्धेतील ही सर्वाधिक पदक संख्या आहे. आजही तिची या स्पर्धेत तसंच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ४० वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. (Mary Kom Not Retired)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.