तब्बल साडेपाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर सोमवारी अयोध्येतील मंदिरात श्रीराम (Ayodhya Ram mandir) मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारात विधीपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजीत मुहूर्तावर श्रीराम मूर्तींला अभिषेक करत प्राणप्रतिष्ठा केली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : झुंडशाहीने कायदे बदलता येणार नाहीत)
देशातील अनेक मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार (Ayodhya Ram mandir) झाले. या मान्यवरांमध्ये अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचे कुटुंब देखील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी रामललाचे दर्शन घेतले. यावेळी श्रीधर वेंबू यांच्या आईचे पैशांनी भरलेले पाकीट मंदिरातच राहिले. मात्र एवढ्या गर्दीतही उत्तर प्रदेश पोलिसांनी हे पाकीट श्रीधर वेंबू यांच्या आईपर्यंत पोहोचवले. त्यामुळे आता मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक होत आहे.
(हेही वाचा – Jaipur Tourist Places : जयपूरमधील ५ लोकप्रिय पर्यटन स्थळं)
नेमकं घडलं काय ?
श्रीधर वेंबू २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांना ही पर्स सापडली. त्यांनी ही पर्स उघडून पाहिली असता त्यात ६६ हजार २९० रुपये रोख, आधार कार्ड आणि पूजेचं साहित्य होतं. पर्समधील आधार कार्ड तपासलं असता पोलिसांना त्याचा मालक कोण आहे याची माहिती मिळाली. पण तोपर्यंत वेंबू कुटुंब आपल्या घरी म्हणजेच तामिळनाडूला पोहोचले होते.
In Ayodhya with my amma Janaki and my brother Kumar and his wife Anu.
Amma is a life-long devotee of Lord Shri Ram. Very blessed to be here.
Jai Shri Ram 🙏🙏🙏 pic.twitter.com/gwFIE8mZJb
— Sridhar Vembu (@svembu) January 21, 2024
त्यानंतर विशेष सुरक्षा दलाने त्यांना संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आपल्या अयोध्येतील (Ayodhya Ram mandir) एका नातेवाईकांचा नंबर दिला. त्यानंतर त्या नातेवाईकांनी मंदिरात जाऊन ही पर्स आपल्या ताब्यात घेतली.
या पर्समध्ये पूजेसाठी (Ayodhya Ram mandir) वापरण्यात येणारी एक छोटी घंटा होती, जी श्रीधर वेंबू यांच्या आईंची प्रिय आहे. ही घंटी परत मिळाल्याने त्या फार आनंदी आहेत.
(हेही वाचा – Fastest Triple Century in FC : तन्मय अगरवालचं प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक साजरं)
या प्रसंगानंतर श्रीधर वेंबू यांनी उत्तर पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Ayodhya Ram mandir) यांचे आभार मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community