Maratha Reservation: मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

202
Maratha Reservation: मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Maratha Reservation: मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मराठा आंदोलकांना मोठे यश मिळाले आहे. राज्यातील युती सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याबाबत अध्यादेशही काढण्यात आला आहे. मुख्य म्हणजे यामध्ये ‘सगे-सोयरे’ मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.

शनिवारी, सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे पोहोचून मनोज जरांगे यांना ज्सूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी आंदोलकांना उद्देशून ते म्हणाले की, जे लोक आंदोलनात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली.

(हेही वाचा –Ayodhya Ram mandir : जेव्हा राम मंदिरात उद्योगपती श्रीधर वेंबू यांच्या आईचं पाकीट हरवतं… )

यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, एक लाख मराठा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ज्या-ज्या मागण्या मान्य केल्या, मग सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक पाटील विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचे काम आपण या ठिकाणी करू तसेच लोकं आंदोलनात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांनाही वाऱ्यावर न सोडता आपले कर्तव्य म्हणून त्या ८० जणांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली आहे शिवाय नोकऱ्याही देणार आहोत.

सर्वसामान्यांचे सरकार…
हे सरकार तुमचे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत, यात गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतरही काही निर्णय असतील. त्याची पूर्ण अंमलबजावणी सरकार करेल, असा शब्द मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे- पाटील यांचे अभिनंदन करतो.” असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

‘शब्द पाळणे’…हीच माझी कार्यपद्धती
मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे, मला आपल्या सर्वांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच मी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला साक्षी मानून शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.