-
ऋजुता लुकतुके
भारतात क्रेडिट कार्डांची (Credit Cards in India) लोकप्रियता आणि वापर वाढत चालला आहे. आणि लवकरच वापरात असलेल्या क्रेडिट कार्डांचा आकडा १० कोटींच्या वर जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीवरूनच हा अंदाज बांधण्यात येत आहे. कारण, रिझर्व्ह बँकेची ताजी आकडेवारी असं सांगते की, डिसेंबर २०२३ पर्यंत वापरात असलेल्या कार्डांची संख्या ९७.७९ कोटी इतकी होती. ती लवकरच १० कोटींच्या वर जाईल हे उघड आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर २०२३ या एकाच महिन्यात बँकांनी जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या १९ लाखांनी वाढली आहे. तर संपूर्ण २०२३ वर्षाचा आढावा घेतला तर १.६७ कोटी क्रेडिट कार्डांची भर पडली. हा आकडा २०२२ मध्ये १.२३ कोटी इतका होता.
(हेही वाचा – Pune Crime : पुणे विमानतळावर २ सोने तस्करांना अटक)
ही संख्या वाढण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एकतर बँकांनी क्रेडिट कार्ड विकण्यासाठी आक्रमक धोरण ठेवलं आहे. आणि त्यासाठीचे पात्रता निकष अनेक ठिकाणी शिथिल केले आहेत. तर ग्राहकांचा ओढाही दिवसेंदिवस डिजिटल पेमेंट तसंच आधी खर्च करून मग बिल भरण्याकडे वाढला आहे.
लोकांची पसंती खाजगी बँकांनी दिलेल्या क्रेडिट कार्डांना असते, असंही आकडेवारीवरून दिसून आलं आहे. क्रेडिट कार्ड बाजारपेठेत एचडीएफसी या बँकेची हिस्सेदारी सध्या सगळ्यात जास्त आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत या बँकेची १.९८ कोटी कार्डं बाजारात होती. तर पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर स्टेट बँक आहे. त्यांची १.८४ कार्डं वापरात आहेत.
क्रेडिट कार्ड बाळगण्याबरोबरच त्यावर होणारे व्यवहारही अलीकडे २५ टक्क्यांनी वाढले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community